National Games 2022  esakal
क्रीडा

National Games 2022 : मल्लखांबमध्ये महाराष्ट्राला अर्धा डझन पदके

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धात पुण्याच्या शुभंकर, अक्षय, रूपालीची चमक

सकाळ वृत्तसेवा

अहमदाबाद : महाराष्ट्राच्या शुभंकर खवले, अक्षय तरळ व रूपाली गंगावणे यांनी मिळवलेल्या सुवर्णपदकांसह महाराष्ट्राने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोमवारी येथे अर्धा डझन पदकांची कमाई केली.शुभंकर या पुण्याच्या खेळाडूने पुरलेल्या मल्लखांबावर अप्रतिम कौशल्य दाखवले. त्याच्या कौशल्यात लवचिकता आणि वेग याचाही समावेश होता. दोरीच्या मल्लखांब प्रकारात अक्षय सुवर्णपदक जिंकले आणि दुहेरी कामगिरी केली. रविवारी त्याने वैयक्तिक सर्वसाधारण प्रकारात सोनेरी कामगिरी केली होती; तर शुभंकर याला रौप्यपदक मिळाले होते.

दोरीच्या मल्लखांब प्रकारात रूपाली गंगावणे हिने सुवर्णपदक पटकावले. तिची सहकारी नेहा क्षीरसागर हिला ब्रॉँझपदक मिळाले. रूपालीने याआधी वैयक्तिक सर्वसाधारण विभागात विजेतेपद पटकावले होते. पुरलेल्या मल्लखांब प्रकारात मात्र रूपाली हिला ब्राँझपदकावर समाधान मानावे लागले. तिची सहकारी जान्हवी जाधव हिने या प्रकारात रौप्यपदक पटकावले.महाराष्ट्राने या स्पर्धेतील पुरुष सांघिक विभागात रौप्य पदक; तर महिलांच्या सांघिक विभागात सुवर्णपदक जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

Maharashtra Ganesh Visarjan Live: मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री गिरगाव चौपाटीवर दाखल

Sharad Pawar : अजितदादांच्या निधनानंतर 'सोमेश्वर' कारखाना निवडणूक बिनविरोध होणार?, शरद पवारांचा पुढाकार; 'सिल्व्हर ओक'वर दोन्ही गटांची बैठक

SCROLL FOR NEXT