National Kabaddi sakal
क्रीडा

National Kabaddi : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा किशोरी संघ जाहीर

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या किशोरी संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. नाशिकच्या बिंदिसा सोनार हिच्याकडे महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सांगलीच्या श्रावणी भोसले हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्राच्या किशोरी संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. नाशिकच्या बिंदिसा सोनार हिच्याकडे महाराष्ट्राच्या किशोरी संघाचे नेतृत्व सोपवण्यात आले आहे. सांगलीच्या श्रावणी भोसले हिची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेकडून महाराष्ट्राचा किशोरी संघ जाहीर करण्यात आला.

यंदा अंतिम विजयी ठरलेल्या जालन्याच्या तीन मुलींचा या संघात समावेश करण्यात आला आहे. पाटणा, बिहार येथील पाटली पुत्र क्रीडा संकुलात ३१ मार्च ते ३ एप्रिल २०२४ या कालावधीत राष्ट्रीय कबड्डी स्पर्धा होणार आहे. पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या किशोर/किशोरी विभाग राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतून ४० खेळाडूंची किशोरी विभागाच्या सराव शिबिराकरिता निवड करण्यात आली होती. या खेळाडूंचे सराव शिबिर अहमदनगर जिल्हा हौशी कबड्डी संघटनेच्या सहकार्याने नेवासा येथे आयोजित करण्यात आले. शिबिरातील ४० खेळाडूंमधून राष्ट्रीय स्पर्धेकरिता १२ जणांचा संघ निवडण्यात आला.

महाराष्ट्राचा किशोरी संघ : १) बिंदिसा सोनार (कर्णधार) - नाशिक शहर २) श्रावणी भोसले (उपकर्णधार) - सांगली ३) मोनिका पवार - जालना ४) राणी भुजंग - जालना ५) साक्षी जाधव - परभणी ६) भाग्यश्री गायकवाड - जालना ७) तनिष्का बोरकर - पिंपरी-चिंचवड ८) समीक्षा पाटील - नंदुरबार ९) मुग्धा शिर्के - रत्नागिरी १०) संस्कृती सुतार - सातारा ११) दृष्टी कुंभार - मुंबई शहर पश्र्चिम १२) आरती शेळके - ठाणे. प्रशिक्षक ः ज्ञानेश्वर ठोंबरे - परभणी. सहायक प्रशिक्षक ः अशोक पानकडे - अहमदनगर. व्यवस्थापिका ः सुवर्णा लोखंडे - अहमदनगर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal PM Balen Shah: नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह शंभर दिवसांमध्येच आले अडचणीत; सरकारविरोधात संघर्ष पेटला

IND vs ZIM 1st T20I: मयांक यादवने इतिहास रचला, पण कौतुक इशान किशनचे झाले! पहिल्याच चेंडूवर असे काय घडले? Video Viral

Ajit Pawar Statue: बारामतीत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राज्यातील पहिल्या पूर्णाकृती पुतळ्याचे भावपूर्ण लोकार्पण; तिरंगा सर्कलजवळ स्मृतीस्थळाला मान्यवरांची उपस्थिती

Latest Marathi Update : मुसळधार पावसामुळे मक्कासार गावात पूरसदृश परिस्थिती निर्माण

Delhi Lathi Charge Protest: दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ल्याचा मोहोळमध्ये तीव्र निषेध; विविध पक्ष, संघटना व वकील संघटनेची भव्य रॅली

SCROLL FOR NEXT