Maharashtra Kesari 2022 Sakal
क्रीडा

Maharashtra Kesari : आर्मी मॅन पृथ्वीराजनं मारलं मैदान; उचलली मानाची गदा

सकाळ डिजिटल टीम

Maharastra Kesari : कुस्ती क्रीडा प्रकारातील मानाची स्पर्धा असलेल्या महाराष्ट्र केसरी (Maharashtra Kesari) कुस्ती स्पर्धेत कोल्हापूरच्या (Kolhapur) मल्लानं बाजी मारलीये. महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यात कोल्हापूरचा पृथ्वीराज पाटील (Pruthviraj Patil) विरूद्ध मुंबई पूर्वचा मल्ल विशाल बनकर (Vishal Bankar) यांच्यात लढत झाली. अटीतटीच्या लढतीत पिछाडीवर असताना पृथ्वीराजनं अखेरच्या 45 सेकंदात सामन्याला कलाटणी दिली. त्याने 5-4 अशा फरकाने सामना जिंकत महाराष्ट्र केसरीचा किताब आपल्या नावे केला. पहिल्या फेरीत बनकरनं 4-0 अशी आघाडी घेतली होती. माती व गादी गटाच्या अंतिम सामने रंगतदार झाले. त्यात गादी गटातून पृथ्वीराज पाटील तर माती गटातून विशाल बनकर महाराष्ट्र केसरीचे दावेदार ठरले. पृथ्वीराज व विशाल यांच्यात उत्कंठावर्धक सामन्यात पृथ्वीरीजने बाजी मारली. राज्य कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने सातारा जिल्हा तालीम संघ आयोजित 64 वी राज्य अजिंक्यपद आणि महाराष्ट्र केसरी स्पर्धा साताऱ्यातील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडली. (Pruthviraj Patil Win Maharashtra Kesari 2022)

पृथ्वीराज पाटील

- मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यामधील देवठाणेचा

- संजीवनीदेवी गायकवाड महाविद्यालयातून बारावीपर्यंत शिक्षण

- मोतीबाग तालमीतून कुस्तीचा श्रीगणेशा

- वस्ताद महान भारत केसरी दादू चौगुले, पैलवान संग्राम पाटील व धनाजी पाटील यांच्याकडून कुस्तीचे धडे

- वजन ९५ किलो

- आर्मीत हवालदार पदावर कार्यरत

- ज्युनिअर वर्ल्ड स्पर्धेत कास्य पदकाचा मानकरी

विशाल बनकर

- पूर्व मुंबईचे प्रतिनिधित्व करतोय

- सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील मांडवे गाव

- १९८७ चे महाराष्ट्र केसरी तानाजी बनकर यांचा पुतण्या

- गेल्या दहा वर्षांपासून कुस्ती क्षेत्रात

- सुरुवातीला भारत भोसले खवसपूर तालमीत ५ वर्ष प्रशिक्षण

- मागील पाच वर्षांपासून कोल्हापुरातील श्री शाहू विजयी गंगावेस तालमीत प्रशिक्षण

- ९७ किलो वजनी गटात २०१८ व २०१९ च्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

West Bengal Politics: मतांसाठी उमेदवार घासत आहेत भांडी; पश्‍चिम बंगालमध्‍ये नवा फंडा; सभांपेक्षा मतदारांशी ‘जवळीक’ महत्त्वाची..

Registrar Dairy Department Transferred : रात्रीतून सुत्रे फिरली गोकुळच्या राजकारणाला नवे वळण, थेट दुग्ध विभागाच्या निबंधकांची उचलबांगडी; सभासद नोंदणी वाद भोवला

Vidhan Parishad Election: विधान परिषदेसाठी भाजपमध्ये 'ही' नावे चर्चेत, आमदारकीसाठी 'फिल्डिंग' लावायला सुरुवात, कुणाला मिळणार संधी?

India Petrochemical Duty Exemption : सरकारचा मोठा निर्णय ! ४० प्रमुख पेट्रोकेमिकल्सवरील आयात शुल्कात सूट,'या' उद्योगांना दिलासा

Latest Marathi News Live Update : रांजणगावमध्ये तरुणावर लाकडी बॅटने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT