Mahendra Singh Dhoni Birthday Leadership Quality esakal
क्रीडा

MS Dhoni Birthday : जडेजाचा चौकार... धोनीचं डोळे मिटून घेणं अन् गंभीरला चपराक! अखेर 40 व्या वर्षी कॅप्टन्सीवरील मळभ दूर

अनिरुद्ध संकपाळ

Mahendra Singh Dhoni Birthday Leadership Quality : महेंद्रसिंह धोनी हे नाव घेतल्यानंतर सर्वात आधी प्रत्येक भारतीयाच्या मनात एका सर्वात यशस्वी कर्णधाराची प्रतिमा तयार होते. 2007 चा टी 20 वर्ल्डकप, 2011 चा वनडे वर्ल्डकप अन् 2013 ला चॅम्पियन्स ट्रॉफी असा थ्री स्टार आपल्या खांद्यावर मिरवणारा कर्णधार भारतात अजूनपर्यंत तरी झाला नाही. धोनीच्या कॅप्टन्सीची चर्चा ही 2007 च्या फायनलमधील जोगिंदर शर्मापासून सुरू होते ते नुकत्याच झालेल्या आयपीएल 2023 मधील कायापालट झालेल्या अजिंक्य रहाणे पर्यंत येऊन थांबते.

धोनीच्या नेतृत्वावर शंका

मात्र कॅप्टन एम. एम. धोनीला जसं डोक्यावर घेणारी जनता आहे तसं त्याला पाण्यात पाहणारीही जनता आहेच. धोनीचे हे घवघवीत यश सौरव गांगुलीने तयार केलेल्या संघाच्या जिवावरच मिळालं आहे. 2007 आणि 2011 मध्ये युवराज होता म्हणून धोनी ट्रॉफी उचलू शकला अशी मांडणी करणारे अनेक लोक आजही सापडतात. त्यांच्या या थेअरी अयोग्यच आहे असं नाही. मात्र धोनीचे नेतृत्व गुण सरसकरट नाकारणे हे एक टोक ठरेल.

धोनीने ही अशी टोकाची टीका वयाच्या 40 व्या वर्षापर्यंत सहन केली. धोनीसोबत 2011 च्या वर्ल्डकपमध्ये खेळलेले एक एक खेळाडू निवृत्त झाल्यानंतर धोनीला 2013 चा अपवाद वगळता आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात यश आलं नाही.

त्यामुळे 'जिंकणारा संघ' होता म्हणून धोनी यशस्वी ठरला या चर्चेला जोर आला होता. याच परिस्थितीत महेंद्रसिंह धोनीने आधी कसोटीचे नंतर वनडे आणि टी 20 चे कर्णधारपद सोडले. तो आता संघात खेळणाऱ्या मेंटॉरच्या भुमिकेत आला होता. विराट कोहली त्याचा पट्टशिष्य होता. मात्र विराटच्या हाताला देखील यश लागले नाही.

निवृत्तीनंतरही सल कायम

अखेर 2019 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये कधी नव्हे ते धोनी धावबाद झाला अन् हा वाघ आता म्हातारा झाला अशी चर्चा सुरू झाली. धोनीनेही 15 ऑगस्ट 2020 ला एक छोटसं ट्विट करून आंतरराष्ट्रीय स्टेजवरून एक्झिट घेतली. धोनी निवृत्त झाला... अख्खा भारत भावूक झाला. मात्र धोनीच्या मानगुटीवरचं ते 'जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार' हे भूत उतरलं नव्हतं.

धोनीची आता रोहित शर्माशी स्पर्धा सुरू झाली होती. या स्पर्धेचे स्टेज होतं ते आयपीएल! आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधार कोण या चर्चेत रोहित शर्मा आयपीएल ट्रॉफींच्या जास्त संख्येमुळे बाजी मारत होता. आयपीएलमध्येही धोनीकडे जगातील अव्वल संघ असल्यामुळेच त्याला यश मिळत होते असा युक्तीवाद केला जात होता.

आयपीएलच्या हंगामात कधी चेन्नई कधी मुंबई विजेतपद पटकावत होते. धोनी श्रेष्ठ कर्णधार की रोहित ही देखील चर्चा सुरू होतीच. मात्र 2022 च्या आयपीएल लिलावात या दोन दिग्गज संघांना आणि पर्यायाने दोन दिग्गज कर्णधारांना मोठा सेटबॅक बसला. या दोन्ही कर्णधारांच्या हातातील तयार केलेला संघ गेला.

आयपीएल 2022 लिलावात चित्रच पालटलं

आयपीएलमध्ये अजून दोन संघांची एन्ट्री झाली. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाची पुरती वाताहत झाली. सगळे स्टार विखुरले गेले. चेन्नईचे सिंह आता म्हातारे झाले होते. चेन्नईला भविष्यासाठी संघ निवडायचा होता. मात्र या तरूण संघाचे नेतृत्व धोनीच करणार होता. 2022 च्या मेगा लिलावात चेन्नईच्या संघाचा चेहराच बदलला. त्यात धोनीलाही निवृत्तीचे वेध लागले होते.

2022 च्या आयपीएल हंगामात धोनीने अचानक कर्णधारपद सोडून जडेजाच्या खांद्यावर नेतृत्वाची धुरा सोपवली. 2008 च्या पहिल्या हंगामापासून चेन्नईची धुरा खांद्यावर वाहणाऱ्या दोन वर्षाच्या बंदीनंतरही चार विजेतेपदं पटकावून देणारा धोनी आता कर्णधार नव्हता.

मात्र नियतीला काही वेगळंच हवं होतं. त्या हंगामात रविंद्र जडेजाच्या नेतृत्वातील युवा सीएसकेला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. त्यामुळे मेंटॉरच्या भुमिकेत गेलेल्या धोनीला हंगामाच्या मध्यावर पुन्हा संघाची धुरा आपल्या खांद्यावर घ्यावी लागली. मात्र तोपर्यंत चेन्नईचे आव्हान संपुष्टात आले होते.

अखेर 2023 मध्ये कॅप्टन्सीवरील मळभ झालं दूर

निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या धोनीला पुन्हा एकदा संघाची बांधणी करू नव्या शिलेदारांना घेत चेन्नईचा जुना नाव लौकिक परत मिळवायचा होता. याचबरोबर त्याच्या मानगुटीवर गेल्या दशकभरापासून 'जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार' हे भूत उतवण्याची देखील नामी संधी चालून आली होती.

धोनीला नियतीने ही संधी 2023 च्या हंगामात दिली. धोनीच्या नेतृत्वातील युवा शिलेदारांनी अडखळत्या सुरूवातीनंतर जोरात पुनरागमन केले. गुणतालिकेत दुसरे स्थान पटकावत प्ले ऑफ गाठले. पहिल्या क्वालिफायमध्ये हंगामातील सर्वात तगड्या गुजरात टायटन्सला पराभवाची धूळ चारत फायनल गाठली. त्यानंतर पुन्हा गुजरातला त्यांच्यात मैदानात अस्मान दाखवत विजेतेपदला गवसणी घातली.

युवा संघ म्हणून चेन्नईसाठी हे विजेतेपद खास आहेच. मात्र कर्णधार धोनीसाठी देखील हे विजेतेपद खूप खास आहे. कारण याच विजेतेपदाने त्याच्या वयाच्या 41 व्या वर्षी भारताचाच नाही तर जगातील एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून शिक्कामोर्तब केले. रविंद्र जडेजाने चौकार मारला अन् धोनीने डोळे मिटत सुटकेचा निश्वास टाकला आता ते मानगुटीवरचं 'जिंकणाऱ्या संघाचा कर्णधार' हे भूत उतरलं.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT