Mahendra Singh Dhoni reveal why he ware 7 number jersey
Mahendra Singh Dhoni reveal why he ware 7 number jersey sakal
क्रीडा

लक नाही तर...; MSD नं शेअर केली ७ नंबर जर्सीमागची 'अनटोल्ड स्टोरी'

Kiran Mahanavar

IPL 2022 : चेन्नई सुपर किंग्स (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याच्या जर्सी क्रमांकाचे अनावरण केले. त्याने क्रिकेटमध्ये 7 क्रमांकाची जर्सी का घातली? 7 क्रमांकाची जर्सी फुटबॉलपासून क्रिकेटपर्यंत आणि अनेक खेळांमध्ये 7 क्रमांकाची जर्सी महत्त्वाची ठरली आहे. जगातील अनेक महान खेळाडूंनी ते परिधान केले आहे. भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसह जवागल श्रीनाथ, शॉन पोलॉक, क्रिस्टियानो रोनाल्डो यांनी ७ नंबरची जर्सी परिधान केली आहे.(MS Dhoni 7 Number Jersey)

महेंद्रसिंग धोनी म्हणाला की, बऱ्याच लोकांच्या मनात एक गैरसमज आहे. 7 आकडा लकी असल्यामुळे मी सुरुवातीपासून या नंबरची जर्सी घालतो, असे काहींना वाटते. ही सगळी अंधश्रद्धा आहे. 7 क्रमांक निवडण्यामागे सरळ आणि सोप कारण आहे. माझा जन्म 7 तारखेला आणि तोही सातव्या महिन्यात झाला. त्यामुळे मी 7 आकडा असलेली जर्सी वापरतो, असे तो म्हणाला.

महेंद्रसिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्जसाठी 4 वेळा इंडियन प्रीमियर लीगचे विजेतेपद पटकावले आहे. धोनी पहिल्या सत्रापासून आतापर्यंत चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करत आहे. धोनीने कर्णधार म्हणूनही भारतीय संघासाठी चमकदार कामगिरी केली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3 वेळा ICC ट्रॉफी जिंकली आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामाची सुरुवात २६ मार्चपासून चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यातील सामन्याने होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs DC Live Score: चक्रवर्तीच्या चक्रव्यूहात अडकले दिल्लीचे धुरंधर, पण कुलदीपच्या फिनिशिंग टचमुळे कोलकातासमोर 154 धावांचं लक्ष्य

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Govinda Dance: गोविंदानं डान्स करुन केला धैर्यशील मानेंचा प्रचार; व्हिडिओ पाहा

Viral Video: गिल लावत होता फिल्डिंग अन् विराटने अचानक येऊन दिला जोरात धक्का, GT vs RCB सामन्यावेळी काय झालं पाहा

Latest Marathi News Live Update : गोवंडीत मिहीर कोटेचा यांच्या प्रचारात दगडफेक

SCROLL FOR NEXT