mahesh mangaonkar anahat singh top in 46th maharashtra open squash bombay gymkhana sport Sakal
क्रीडा

Maharashtra Open Squash : महाराष्ट्र राज्य स्क्वॉश स्पर्धेमध्ये महेश, अनाहतला अव्वल मानांकन

स्पर्धा २ ते ६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत बॉम्बे जिमखाना येथे आयोजित करण्यात आली

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र राज्य खुल्या स्क्वॉश स्पर्धेतील पुरुष आणि महिला गटात अनुक्रमे महाराष्ट्राचा महेश माणगावकर आणि दिल्लीची अनाहत सिंग यांना अव्वल मानांकन देण्यात आले आहे. ही स्पर्धा २ ते ६ सप्टेंबर २०२३ या कालावधीत बॉम्बे जिमखाना येथे आयोजित करण्यात आली आहे.

पुरुष गटात मुंबईच्या माणगावकर याच्यापाठोपाठ राहुल बैठा याला मानांकन मिळाले आहे. ६४ खेळाडूंच्या ड्रॉमध्ये सर्व्हिसेसचा संदीप जांगरा आणि सूरज चंद या महाराष्ट्रातील खेळाडूंना संयुक्तरित्या तिसरे आणि चौथे मानांकन देण्यात आले आहे.

महिला एकेरीत १६ खेळाडूंचा समावेश असून अव्वल मानांकित अनाहत पाठोपाठ महाराष्ट्राची जेनेट विधी आहे.महाराष्ट्राची अंजली सेमवाल आणि तामिळनाडूची रथिका सुथंथिरा सीलन अनुक्रमे तिसरी-चौथी मानांकित आहे.

स्क्वॉश रॅकेटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसआरएफआय) आणि महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट संघटना (एमएसआरए) यांच्या संयुक्त विद्यमाने बॉम्बे जिमखाना येथे या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य खुली स्क्वॉश स्पर्धा ही भारतातील सर्वात जुनी आणि प्रमुख स्पर्धांपैकी एक आहे.

१९ प्रकारांचा समावेश असलेल्या या प्रमुख स्पर्धेत एकूण ५३० खेळाडू खेळतील. पुरुष आणि महिला गटासह ९, ११, १३, १५, १७ आणि १९ वर्षांखालील मुले आणि मुली, तसेच ३६, ४५, ५५ आणि ६५ वर्षांवरील पुरुष अशा गटांमध्येही खेळाडू सर्वस्व पणाला लावतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai: उघड्या मॅनहोलमध्ये पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू, BMC चा निष्काळजीपणा जीवावर बेतला... माणूस पडतानाचा Video समोर... बचावकार्य अपयशी

Mumbai Pune Red Alert : राज्यात मान्सूनची दमदार वाटचाल ! पुढील ४ दिवस पावसाचे; मुंबई, पुण्यासह 'या' जिल्ह्यांत रेड अलर्ट

Latest Marathi News Live Update : मालेगाव महापालिकेवर 'लँड जिहाद विरोध' जनआक्रोश मोर्चा

Mumbai Manhole Accident : मुंबईत २० ते २५ फूट खोल उघड्या मॅनहोलमध्ये माणूस पडला; बचावकार्य सुरू... BMC चा निष्काळजीपणा चव्हाट्यावर

अटल टनेलजवळ भीषण अपघात, बोगद्यातून बाहेर येताच स्कॉर्पिओ थेट नदीत बांधकाम सुरू असलेल्या पिलरवर लटकली, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT