malaysia masters super 500 pv sindhu hs prannoy srikanth lakshya satwik chirag badminton esakal
क्रीडा

Malaysia Masters Super 500 : पी. व्ही. सिंधू, प्रणॉय निराशा मागे टाकणार?

मलेशिया बॅडमिंटन स्पर्धा आजपासून

सकाळ वृत्तसेवा

क्वालालम्पूर : भारतीय बॅडमिंटनपटूंना सुदिरमन करंडकात अपयशाला सामोरे जावे लागले. आता ही निराशा मागे टाकून भारतीय खेळाडू उद्यापासून (ता.२२) क्वालालम्पूर येथे सुरू होणाऱ्या मलेशिया मास्टर्स सुपर ५०० स्पर्धेमध्ये आपला शानदार खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाले आहेत. महिला एकेरीत पी. व्ही. सिंधू व पुरुष एकेरीत एच. एस. प्रणॉय याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.

सुदिरमन करंडकात भारतावर साखळीतच गारद होण्याची नामुष्की ओढवली. भारतीय संघाला चीन तैपेई व मलेशिया या दोन संघांकडून सपाटून मार खावा लागला. एकेरी विभागात भारताला एकही लढत जिंकता आला नाही. पण आता हे अपयश मागे टाकून पॅरिस ऑलिंपिक पात्रता फेरीकडेही भारतीयांना लक्ष द्यावे लागणार आहे. त्यामुळे मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा महत्त्वाची भूमिका बजावू शकते.

पी. व्ही. सिंधूला सुदिरमन करंडकातील लढतींमध्ये तेई यींग व गोह वेई यांच्याकडून हार पत्करावी लागली. आता सिंधूसमोर मलेशिया मास्टर्स स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत डेन्मार्कच्या लाईन ख्रिस्तोपर्सन हिचे आव्हान असणार आहे. सिंधूसह महिला एकेरीत मालविका बन्सोड व आकर्षी कश्‍यप या भारतीय खेळाडूंचाही सहभाग असणार आहे. पण या दोघींना मुख्य फेरीआधी पात्रता फेरीत लढावे लागणार आहे.

श्रीकांत, लक्ष्यकडूनही आशा

एच. एस. प्रणॉय पहिल्या लढतीत चीन तैपेईच्या चाऊ टिएन चेन याच्याशी दोन हात करील. किदांबी श्रीकांत आत्मविश्‍वास मिळवण्यासाठी बॅडमिंटन कोर्टवर उतरणार आहे. त्याच्यासमोर तुलनेने कमकुवत आव्हान असेल. श्रीकांतला जपानच्या कांता सुनेयामा याला टक्कर द्यावी लागणार आहे.

लक्ष्य सेन याला सुदिरमन करंडकात एकही लढत खेळण्याची संधी मिळाली नाही. आता पहिल्या फेरीत तो सिंगापूरच्या लोह किन येव या खेळाडूचा सामना करील. पुरुष दुहेरी गटात सात्विक साईराज रंकीरेड्डी - चिराग शेट्टी या जोडीवर भारत अवलंबून असणार आहे. पहिल्या फेरीत त्यांना बेन लेन सीन वेंडी यांचे आव्हान परतवून लावावे लागणार आहे. तसेच पुरुष एकेरीत बी. साई. प्रणीत, मिथुन मंजुनाथ व प्रियांशू राजवत यांना पात्रता फेरीत खेळावे लागणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Recruitment: बीडमध्ये ७८१ पदांसाठी भरती! कोणती पदं भरली जाणार? शैक्षणिक पात्रता काय? वाचा सविस्तर...

Rohit Pawar : "भाजप निवडणूक हरेल म्हणून मुरलीधर मोहोळ घाबरले आहेत" - रोहित पवार

Elephant Viral Video: अरे बापरे! हत्तीची ही शक्ती पाहून डोळे फुटतील! काही क्षणातच उचलली भारी ट्रॉली, जणू खेळणीच! व्हिडिओ व्हायरल

Mumbai News: नव्या वर्षापासून रुग्णालयात जेवण बंद, नर्सेस आणि कर्मचाऱ्यांची अडचण; कारण काय?

Accident News: दुर्दैवी! काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्र्याच्या मुलीसह तीन जणांचा मृत्यू; घटनेनं हळहळ, काय घडलं?

SCROLL FOR NEXT