Syazrul Idrus T20 Cricket Record esakal
क्रीडा

T20 Cricket Record : W, W, W, W, W, W, W... भल्या भल्यांना जमलं नाही ते मलेशियाच्या इद्रुसने करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

T20 Cricket Record : मलेशिया हा क्रिकेट जगतात तसा नवखा संघ आहे. या संघातील खेळाडूंची नावे क्वचितच माहिती होतात. मात्र मलेशियन संघातील वेगवान गोलंदाज सयाझरूल इद्रुस (Syazrul Idrus) हे नाव आता कोणी विसरू शकणार नाही. कारण या पठ्ठ्याने टी 20 क्रिकेटमध्ये एक मोठा इतिहास रचला. यापूर्वी भल्या भल्या टी 20 स्टार क्रिकेटपटूंना जे जमलं नाही ते या मलेशियाच्या वेगवान गोलंदाजाने करून दाखवलं.

इद्रुस हा आंतरराष्ट्रीय टी 20 पुरूष क्रिकेट सामन्यामध्ये 7 विकेट्स घेणारा पहिला गोलंदाज ठरला आहे. त्याने चीनविरूद्धच्या सामन्यात 8 धावात 7 विकेट्स घेण्याचा मोठा कारनामा केला. टी 20 वर्ल्डकप आशिया बी पात्रता फेरीतील सामन्यात इद्रुसच्या या भन्नाट कामगिरीच्या जोरावर मलेशियाने चीनवर आठ विकेट्सनी दमदार विजय मिळवला.

मलेशियाचा 32 वर्षाचा इद्रुस हा आतापर्यंत 22 टी 20 सामने खेळला आहे. त्याने टी 20 क्रिकेट सामन्यात सर्वाधिक विकेट घेण्याचा पीटर अहोचा विक्रम मोडला. पीटरने 5 धावात 6 विकेट्स घेतल्या होत्या. टी 20 क्रिकेट इतिहासात एका सामन्यात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचा दीपक चाहर (Deepak Chahar) हा तिसऱ्या स्थानावर आहे. (T20 World Cup Asia B Qualifier)

त्याने बांगलादेशविरूद्ध 2019 मध्ये 7 धावात 6 बळी घेतले होते. तर झिम्बाब्वेचा दिनेश नाकरानी 7 धावात 6 विकेट्स घेत तिसऱ्या स्थानावर आहे. पाचव्या स्थानावर श्रीलंकेचा फिरकीपटू अजंता मेंडिस आहे. त्याने 2012 मध्ये झिम्बाब्वेविरूद्ध 8 धावात 6 विकेट्स घेतल्या आहेत.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर मलेशिया आणि चीनच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करणारा चीनचा संघ 11.2 षटकात 23 धावातच गुंडाळला गेला. त्यांच्या एकाही फलंदाजाला दुहेरी आकडा गाठता आला. इद्रुसच्या गोलंदाजीची दहशत इतकी होती की चीनच्या सगळ्या फलंदाजांनी नांगी टाकली. सलामीवीर वेई गुओ लेईने सर्वाधिक 7 धावा केल्या.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT