Mamata Banerjee Sourav Ganguly esakal
क्रीडा

Mamata Banerjee : गांगुलीसाठी ममतांची बॅटिंग; थेट पंतप्रधानांकडे केली 'ही' मागणी

अनिरुद्ध संकपाळ

Mamata Banerjee Sourav Ganguly : भारताचा माजी कर्णधार सौरभ गांगुलीला बीसीसीआयची दुसरी टर्म नाकारण्यात आली आहे. यावरून भारतीय क्रिकेट जगतातच नाही तर राजकीय वर्तुळातील देखील वातावरण चांगलेच तापले आहे. या घटनाक्रमानंतर तृणमूल काँग्रेस आणि भाजप एकमेकांवर टीका करत आहे. दरम्यान, बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी देखील आज (दि. 17) सौरभ गांगुलीसाठी जोरदार बॅटिंग केली. त्यांनी तर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनाच या विषयात लक्ष घालण्याची विनंती केली.

बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सोमवारी उत्तर बंगलाच्या दौऱ्यावर जाण्यापूर्वी म्हणाल्या की, 'मी पंतप्रधानांना विनंती करते की सौरभ गांगुलीला आयसीसीची निवडणूक लढवण्याची परवानगी देण्यात यावी. मी सरकारला क्रिकेटच्या हितासाठी हा निर्णय घेण्याची विनंती करत आहे.' ममता बॅनर्जींनी सौरभ गांगुलीवर अन्याय झाल्याचा आरोप केला.

दरम्यान, शनिवारी सौरभ गांगुलीने तो बंगाल क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली. सौरभ गांगुली म्हणाला की, 'मी क्रिकेट असोसिएशन ऑफ बंगालची निवडणूक लढवणार आहे. 22 ऑक्टोबरला अर्ज दाखल करायचा आहे. मी पाच वर्ष सीएबीमध्ये होतो. लोछा समितीच्या नियमांनुसार आता मी चार वर्षे पदावर राहू शकतो. मला आशा आहे की माझे पॅनल 20 तारखेला तयार केलं जाईल.' सध्याचे बंगाल क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अभिषेक दालमिया यांनी सौरभ गांगुलीच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे सांगितले आहे.

सौरभ गांगुलीवर अन्याय झाला : ममता बॅनर्जी

सौरभ गांगुली भाजपमध्ये दाखल झाला नाही म्हणून त्याला अध्यक्षपदावरून हटवले अशी टीका तृणमूल काँग्रेसने केली होती. तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांप्रमाणे पक्षाच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील गांगुलीवर अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवली. त्या म्हणाल्या की सौरभ गांगुली राजकारणाचा बळी ठरला आहे. यामुळे क्रिकेटचे भले होणार नाहीये. या प्रकरणी पंतप्रधानांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder 5 KG पाच किलो एलपीजी सिलिंडरबाबत नवा नियम, खरेदीसाठी ओळखपत्र बंधनकारक

बारामतीत काँग्रेसनं उमेदवारी दिलेले आकाश मोरे कोण? अजित पवारांच्या विरोधात डिपॉझिट झालेलं जप्त

RCB vs CSK: अरे काय केलं... विराट कोहलीचा शिवम दुबेने एकदम सोपा कॅच सोडला; अनुष्का शर्माही शॉक; Video Viral

अल्पवयीन बहिणींच्या लग्नाचा घाट, पोलिसांसह अधिकाऱ्यांनी रोखला बालविवाह

IPL 2026: १९ षटकार... टीम डेव्हिडची वादळी फटकेबाजी, पडिक्कलचीही फिफ्टीच; CSK विरुद्ध RCB च्या अडीचशे धावा पार

SCROLL FOR NEXT