Manika Batra and G. Sathiyan Twitter
क्रीडा

WTT Contender : जोडीदार बदलत मनिकाची जेतपदाला गवसणी

मनिका बत्रा मिश्र दुहेरीत साथियानसोबत फार कमी सामने खेळली आहे. ती नेहमी शरथ कमलच्या साथीने खेळताना पाहायला मिळाले आहे.

सुशांत जाधव

ऑलिम्पिक स्पर्धेत असभ्य वर्तनामुळे वादात अडकलेल्या भारताच्या टेबल टेनिस स्टार मनिका बत्रा हिने जी साथियानच्या साथीनं WTT Contender स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. हंगेरीची राजधानी असलेल्या बुडापेस्टमध्ये झालेल्या स्पर्धेतील मिश्र दुहेरी प्रकारात भारताच्या जोडीनं हंगेरीच्या डोरा आणि नंदौर या जोडीला 3-1 असा पराभव केला. शुक्रवारी झालेल्या फायनल लढतीत भारताच्या जोडीने 11-9, 9-11, 12-10 आणि11-6 असा विजय नोंदवत जेतेपदावर नाव कोरले.

मनिका बत्रा मिश्र दुहेरीत साथियानसोबत फार कमी सामने खेळली आहे. ती नेहमी शरथ कमलच्या साथीने खेळताना पाहायला मिळाले आहे. जपानमधील टोकियोत पार पडलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतही ती शरथ कमलसोबतच खेळताना दिसली होती. ऑलिम्पिकमध्ये या जोडीला लक्षवेधी कामगिरी करण्यात अपयश आले. त्यानंतर मनिकाने साथियानसोबत खेळण्याचा निर्णय घेतला. या जोडीचा हा बदलाचा प्रयोग यशस्वी ठरला.

ऑलिम्पिक स्पर्धेनंतर शिस्तभंग केल्याचा ठपका

ऑलिम्पिक स्पर्धेत मनिका बत्राने राष्ट्रीय कोच सौम्यदीप रॉय यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता. कोचच्या मार्गदर्शनाशिवाय खेळताना तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. तिच्या या भूमिकेवर टेबल टेनिस फेडरेशन ऑफ इंडिया (TTFI) ने आक्षेप नोंदवला होता. तिच्यावर शिस्तभंग केल्याप्रकरणी नोटीसही बजावण्यात आली होती. ऑलिम्पिक स्पर्धेला मनिका वैयक्तिक कोच परांजपे यांच्यासह टोकियोला गेली होती. महिला एकेरीतील मुख्य सामन्यात तिच्या पर्सनल कोचला स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यात आली नव्हती. याच रागातून तिने राष्ट्रीय संघाच्या कोचकडून मार्गदर्शन घेण्यास नकार दिला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Development : पुण्याच्या प्रश्नांचा विधानसभेत आवाज, आमदारांकडून उपाययोजनांची मागणी; वाहतूक कोंडीसह अतिक्रमणे हटवावीत

Ashadhi Wari 2025: 'जो तरुण भाग्यवंत, नटे हरी कीर्तनात'; आधुनिक वाद्यांसह भारुडकार कृष्णा महाराज यांची भारुडसेवा

Gadchiroli Education: गडचिरोलीचे शिक्षणाधिकारी पोलिसांना शरण; बोगस शिक्षक पराग पुडकेचा प्रस्ताव केला होता मंजूर

ख्रिश्चन आक्रमक! आमदार पडळकरांचे ख्रिश्चन धर्माबद्दल अवमानकारक वक्तव्य; मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखविण्याचा इशारा

Pune News : आपत्तींमुळे अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम, लेफ्टनंट जनरल धीरज सेठ; लष्करी अभियंत्यांच्या कामगिरीचेही कौतुक

SCROLL FOR NEXT