manika batra first female indian paddler to clinch bronze at asian table tennis tournament Bangkok sakal
क्रीडा

Manika Batra : मनिका बत्राची ऐतिहासिक कामिगरी

आशियाई टेबल टेनिस करंडकामध्ये ब्राँझ

सकाळ वृत्तसेवा

बँकॉक : भारताची अव्वल महिला टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्रा हिने बँकॉकमध्ये सुरू असणाऱ्या आशियाई टेबल टेनिस करंडकामध्ये ब्राँझपदक जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. ती या स्पर्धेत पदक जिंकणारी भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे. शनिवारी झालेल्या ब्राँझ पदकाच्या सामन्यात मनिकाने जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असणाऱ्या आणि तीन वेळच्या आशियाई विजेत्या जपानच्या हिना हयाटाचा ४-२ असा पराभव केला. मनिकाने हयाटावर सामन्यात ११-६, ६-११, ११-७, १२-१०, ४-११ आणि ११-२ असे वर्चस्व राखले.

उपांत्य फेरीच्या सामन्यात मनिकाला जपानच्याच मिमा इटोकडून ८-११, ११-७, ७-११, ६-११, ११-८, ७-११ असे पराभूत व्हावे लागले होते. त्यामुळे तिला ब्राँझपदकाची लढत खेळावी लागली. या स्पर्धेतील पहिल्या सामन्यात मनिकाने चीनच्या शेन शिंगटाँगचा ८-११, ११-९, ११-६, ११-६, ९-११, ८-११, ११-९ असा पराभव केला होता. या विजयानंतर उपांत्यपूर्व फेरीच्या चुरशीच्या सामन्यात तिने तैवानच्या चेन झ्यू यूचा ६-११, ११-६, ११-५, ११-७, ८-११, ९-११, ११-९ असा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

SCROLL FOR NEXT