Table Tennis sakal
क्रीडा

Table Tennis : भारताच्या विजयात मनिका बत्रा चमकली ; जागतिक टेबल टेनिस स्पर्धेत हंगेरीवर मात

भारताच्या महिला संघाने रविवारी हंगेरीवर ३-२ असा विजय मिळवला. जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील भारताच्या या विजयात मनिका बत्रा हिने मोलाचा वाटा उचलला.

प्रशांत पाटील

बुसान : भारताच्या महिला संघाने रविवारी हंगेरीवर ३-२ असा विजय मिळवला. जागतिक टेबल टेनिस स्पर्धेतील भारताच्या या विजयात मनिका बत्रा हिने मोलाचा वाटा उचलला. तिने दोन्ही एकेरीच्या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूवर मात केली.

मनिका हिने पहिल्या एकेरीच्या लढतीत डोरा माडारास हिच्यावर ८-११, ११-५, १२-१०, ८-११, ११-४ अशी मात करीत भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जिऑर्जिना पोटा हिने श्रीजा अकुला हिला पराभूत करीत हंगरीसाठी १-१ अशी बरोबरी साधली. त्यानंतर अयहिका मुखर्जी हिने बर्नाडेट बॅलिंट हिच्यावर ७-११, ११-६, ११-७, ११-८ असा विजय मिळवत भारताला २-१ असे पुढे नेले.

हंगरीच्या डोरा माडारास हिने श्रीजा अकुलावर विजय मिळवत हंगरीसाठी २-२ अशी बरोबरी साधली. मनिका बत्रा या वेळी भारतासाठी धावून आली. तिने अखेरच्या लढतीत जिऑर्जिना पोटा हिला ११-५, १४-१२, १३-११ असे सहज पराभूत केले आणि भारताला ३-२ असा रोमहर्षक विजय मिळवून दिला. भारतीय महिला संघासमोर आता स्पेन व उझबेकिस्तानचे आव्हान असणार आहे.

पुरुषांचा पराभव

एकीकडे भारतीय महिला संघाने हंगरीला पराभूत केले, दुसरीकडे मात्र भारतीय पुरुष संघाला पराभवाचा सामना करावा लागला. पोलंडने भारतीय पुरुष संघाला ३-१ असे नमवले. हरमीत देसाई याने एकमेव विजय मिळवला. शरथ कमल - मानव ठक्कर या जोडीचा पराभव झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कार आणि सिमेंट मिक्सर ट्रकची भीषण धडक; ११ जणांचा जागीच मृत्यू; कल्याण अहिल्यानगर हायवेवर दुर्घटना

"इंडस्ट्रीतून हाकलून द्यावं इतका मी बेशिस्त वागलो" आस्ताद काळेने उघड केली कठीण काळाची आठवण; म्हणाला..

Latest Marathi News Live Update: अशोक खरातला ७ दिवसांची न्यायालयीन कोठडी

Strait of Hormuz: शेवटच्या क्षणी काय घडलं? पाकिस्तानमधील बैठक का फिस्कटली? इराणने सांगून टाकलं

पुण्यात PhD करणाऱ्या तरुणीनं संपवलं आयुष्य, प्राध्यापकाने २ दिवसांपूर्वी स्टॅम्पवर लिहून दिलेलं चूक झाली; चिठ्ठीत लिहिलं कारण

SCROLL FOR NEXT