Manu Bhaker Paris Olympic 2024 sakal
क्रीडा

Manu Bhaker : भगवत गीतेचे स्मरण अन् मनु भाकरने साधला शेवटचा निशाना...! कास्य जिंकल्यानंतर प्रतिक्रियेचा व्हिडिओ मन जिंकणारा

पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकर हिने ब्राँझपदक मिळवले. वास्तविक तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले.

Kiran Mahanavar

रौप्यपदक थोडक्यात हुकले असले तरी देशासाठी ब्राँझपदक जिंकले याचा आनंद आणि अभिमान आहे. निर्णायक क्षणी भगवद्गीतेमधील सार माझ्या कामी आले, अशी भावना ब्राँझपदक विजेत्या मनू भाकर हिने व्यक्त केली.

पॅरिस ऑलिंपिकमध्ये १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात मनू भाकर हिने ब्राँझपदक मिळवले. वास्तविक तिचे रौप्यपदक थोडक्यात हुकले. सुवर्ण आणि रौप्यपदके जिंकणाऱ्या कोरियन नेमबाजांविरुद्ध मनू लढत होती. अंतिम चार खेळाडूंच्या शर्यतीत मनू तिसऱ्या स्थानावर होती; पण यावेळी एकाग्रता राखून मनूने पहिल्या तिघांमध्ये स्थान कायम राखले.

अंतिम क्षणी माझ्यामध्ये जेवढी क्षमता आहे तेवढी मी पणास लावली होती. मी भगवद्गीता वाचते आणि त्याप्रमाणे मनाची शक्तीही वाढवते. जेवढे तुम्ही करू शकता ते काम करायचे. नशीब तुमच्या हाती नसते. गीतेमध्ये कृष्णाने अर्जुनाला सांगितलेय, तू तुझे कर्म करत राहा... पुढचा विचार करू नको. मीसुद्धा तेच केले. अंतिम क्षणी माझ्या मनातही तोच विचार होता. आपल्या ध्येयावर मी लक्ष केंद्रीत केले होते, असे मनूने सांगितले.

टोकियो ऑलिंपिकमध्ये झालेल्या प्रकारानंतर मी फार निराश झाले होते. त्यातून बाहेर पडण्यासाठी मला बराच वेळ द्यावा लागला होता; पण त्यानंतर मी अधिक कणखर होऊन परतले; परंतु जे झाले तो इतिहास होता.

पात्रता फेरीतून मी अंतिम फेरी निश्चित केली तेव्हापासून मला आजच्या दिवसाचे वेध लागले होते. हा दिवस आव्हानात्मक असणार, याची जाणीव होती. कारण येथे असलेले भारतीय आणि देशातून मला सपोर्ट करणारे सर्व भारतीयांचे मी आभारी आहे. हे पदक माझे नसून संपूर्ण देशवासीयांचे आहे.

या ऑलिपिक स्पर्धेत भारतीयांना अधिकाधिक पदके मिळवावी, असे मला मनापासून वाटते. मी या पदकांची सुरुवात केली याचा आनंद आहे. आता माझ्या मनात कोणत्या भावना दाटून येत आहेत त्या शब्दबद्ध करणे कठीण आहे. तसेच, उद्या, परवाही माझे सामने आहेत.

सर्वांचे आभार

कठीण काळात माझ्यासोबत राहिलेले आणि मला प्रोत्साहन देणारे माझे कुटुंब, माझे प्रशिक्षक यांचेच केवळ मी आभार मानणार नाही तर संपूर्ण देशवासीयांचीही मी आभारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: यवतमाळमध्ये कडक उन्हामुळे शेतातील डिस्ट्रिब्युशन बॉक्सने घेतला पेट

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT