Manu Bhaker | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

'दोन ब्राँझ मेडल जिंकणं माझ्यासाठी...', Paris Olympic मधील मोहिम संपल्यानंतर मनू भाकर गहिवरली

Manu Bhaker Social Media Post: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत दोन पदकं जिंकून आपली मोहिम संपल्यानंतर मनू भाकर व्यक्त झाली आहे.

Pranali Kodre

Manu Bhaker Post After end of Paris Olympic 2024 campaign: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धा भारताची २२ वर्षीय युवा नेमबाज मनू भाकर हिच्यासाठी विक्रमी ठरली. ती या स्पर्धेत नेमबाजीच्या तीन प्रकारांमध्ये सामील झाली होती आणि विशेष म्हणजे तिन्ही प्रकारात तिने अंतिम फेरी गाठली.

यामध्ये तिने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात महिला आणि मिश्र गटात कांस्य पदक जिंकले, मात्र शनिवारी (३ ऑगस्ट) झालेल्या महिलांच्या २५ मीटर पिस्तुल प्रकारात तिचं पदक थोडक्यात हुकलं. ती चौथ्या क्रमांकावर राहिली. यासह तिची या स्पर्धेतील मोहिम संपली. दरम्यान, तिने दोन पदकं जिंकून मोठे विक्रमही रचले.

आता तिने यानंतर शनिवारी सोशल मीडियावर सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच तिच्या यशाबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.

तिने खास पोस्ट करत लिहिले, 'मला जो पाठिंबा आणि शुभेच्छा मिळत आहेत, त्यामुळे मला गहिवरून आलं आहे. दोन कांस्य पदकं जिंकणं हे स्वप्न पूर्ण होण्यासारखं होतं. हे यश माझ्या एकटीचं नाही, तर ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला इथपर्यंत पोहचण्यासाठी पाठिंबा दिला, त्या प्रत्येकाचं आहे.'

'मी हे यश माझ्या कुटुंबाशिवाय, प्रशिक्षक जसपाल राणा सरांशिवाय आणि जे माझ्या पाठीशी उभे होते, त्या सर्वांशिवाय मिळवू शकले नसते, यात NRAI , TOPS , SAI, OGQ, Performax या सर्वांचा विशेषत: हरियाणा सरकारचा वाटा आहे.'

तिने पुढे लिहिले, 'माझ्या देशासाठी सर्वात मोठ्या स्टेजवर स्पर्धा खेळणे आणि कामगिरी करणे हा अत्यंत अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण आहे. माझ्या या प्रवासाचा भाग झाल्याबद्दल आणि प्रत्येक पावलावर माझ्या बरोबर राहण्याबद्दल आभारी आहे.'

'तुम्ही केललं कौतुक माझ्यासाठी मोठं आहे. पॅरिसमधील माझ्या मोहिमेचा शेवट कडू-गोड राहिला, पण भारताच्या यशात योगदान देण्याचा आनंद आहे. जय हिंद.'

मनू भाकर ही ऑलिम्पिकमध्ये दोन वैयक्तित पदके जिंकणारी भारताची तिसरीच खेळाडू आहे. यापूर्वी पीव्ही सिंधू आणि सुशील कुमार यांनी हा पराक्रम केला आहे. तसेच स्वातंत्र्यानंतर एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी ती भारताची पहिलीच खेळाडू देखील आहे. याशिवाय दोन पदकं जिंकणारी पहिली आणि एकमेव भारतीय नेमबाजही आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT