Manu Bhaker | Paris Olympic 2024 Sakal
क्रीडा

Paris Olympic 2024: भारतीय नारी सब पर भारी! मनू भाकरने ब्राँझ मेडल जिंकत रचला इतिहास

Manu Bhaker Won Medal in Paris Olympic 2024: २२ वर्षीय नेमबाज मनू भाकरने रविवारी कांस्य पदक जिंकले. हे पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचं पहिलंच पदक ठरलं.

Pranali Kodre

Manu Bhaker in Paris Olympic 2024: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेतून भारतीयांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताची नेमबाज मनू भाकरने कांस्य पदक जिंकत इतिहास रचला. तिने यासह भारताचं पदकांचा खातंही उघडलं आहे.

२२ वर्षीय मनू भाकरने महिला १० मीटर एअर पिस्तुल क्रीडा प्रकारात कांस्य पदकाची कमाई केली. तिने शनिवारी पात्रता फेरीत तिसरा क्रमांक मिळवत अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. आता अंतिम फेरीत तिने २२१.७ गुण मिळवत पदकावर हक्क सांगितला.

मनू भाकर नेमबाजीमध्ये पदक जिंकणारी भारताची पाचवी नेमबाज, तर पहिलीच महिला नेमबाज ठरली आहे. यापूर्वी भारताकडून नेमबाजीत राज्यवर्धन सिंग राठोड (२००४), अभिनव बिंद्रा (२००८), विजय कुमार (२०१२) आणि गगन नारंग (२०१२) यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले आहे.

महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात मनू भाकरने स्टेज 1 मध्ये 50.4 स्कोर केला ज्यामुळे ती स्टेज 1 नंतर दुसऱ्या स्थानावर होती. त्यानंतर १३ शॉट्सपर्यंत ती पहिल्या दोनमध्ये होती.

मात्र, १५ व्या शॉटनंतर ती तिसऱ्या क्रमांकावर घसरली. 16 शॉट्सनंतर मनूचा स्कोअर 171 झाला होता आणि ती त्यावेळी तिसऱ्या स्थानावर होती. यानंतर मात्र, तिने तिसरे स्थान कायम राखले. अखेर तिने कांस्य पदकावर नाव कोरले.

या क्रीडा प्रकारात पहिल्या दोन क्रमांकावर दक्षिण कोरियाचे खेळाडू राहिले. ओ ये जिन हिने २४३.२ गुणांसह सुवर्णपदकावर नाव कोरले, तर किम येजी हिने २४१ गुण मिळवत रौप्य पदक जिंकले.

पदक जिंकल्यानंतर मनू म्हणाली, 'मला खूप छान वाटत आहे. मी खूप मेहनत घेतली होती. मी माझ्या पूर्ण उर्जेने खेळत होते. कांस्य पदक जिंकले असले, तरी मला आनंद आहे मी देशासाठी जिंकू शकले. मी फक्त त्याक्षणी जे करू शकत होते, त्यावरच लक्ष केंद्रित केले होते.

'हे पदक सर्वांचं आहे. आमच्या टीमने मिळून यासाठी प्रयत्न केले होते. आशा आहे अजून भारताने पदकं जिंकायला हवेत. मला आत्ता काय वाटत आहे, हे शब्दात सांगणं कठीण आहे.'

तिने यानंतर तिच्या कुटुंबाने, प्रशिक्षकांनी आणि स्पॉन्सर्सने दिलेल्या पाठिंब्याबद्दल आभारही व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अंबरनाथमध्ये सत्तासंघर्षाला नवं वळण! व्हीप न मानल्यास अपात्रतेची कारवाई, राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना भाजपचा इशारा

Solapur News: भारतातील सर्वात मोठा दगडी चक्रव्यूहाच्या संवर्धनासाठी ‘इंट्याक’ची हाक; खडकीतील दोन हजार वर्षांपूर्वीचा वारसा पाहण्यासाठी ‘हेरिटेज वॉक’!

Latest Marathi News Live Update : परभणीत ५ एकरातला ऊस जळून खाक

Uddahv Thackeray : ‘भाजपकडून राज्यात भ्रष्टाचाराचे प्रदूषण’

CM Devendra Fadnavis : पुण्याची क्षमता २८० बिलियन डॉलर्सची; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मांडला पुण्याच्या विकासाचा ‘रोडमॅप’

SCROLL FOR NEXT