File photo 
क्रीडा

अझलन शाह हॉकी : भारताला मोठा विजय आवश्‍यक

वृत्तसंस्था

इपोह : अननुभवी आणि युवा भारतीय संघ अझलन शाह हॉकी स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्याच्या अपेक्षा बाळगून आहे. मात्र, त्यासाठी त्यांना उद्या आयर्लंडविरुद्ध मोठा विजय मिळवावा लागेल. त्याचबरोबर अन्य सामन्यांच्या निकालावरही अवलबूंन रहावे लागेल. 

पहिल्या तीन सामन्यांनंतर भारताला चौथ्या सामन्यात विजयाचा चेहरा दिसला. मलेशियाला त्यांनी 5-1 अशा मोठ्या फरकाने हरवले. त्यापूर्वी भारताला स्पर्धेत अर्जेंटिना आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभव पत्करावा लागला होता. इंग्लंडविरुद्धचा सामना बरोबरीत राहिला. 

ऑस्ट्रेलियाने आपले चारही सामने जिंकून यापूर्वीच अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यांचा प्रतिस्पर्धी म्हणून केवळ आयर्लंड संघालाच संधी नाही. अन्य संघाला अंतिम फेरी खेळण्याची संधी आहे. 

गुणतक्‍त्यातील दुसऱ्या स्थानावरील अर्जेंटिनाचे 7, पाठोपाठ मलेशियाचे सहा, इंग्लंडचे 5 आणि भारताचे 4 गुण झाले आहेत. चार पराभवामुळे आयर्लंड यापूर्वी स्पर्धेबाहेर गेले आहे. त्यामुळे ही संधी साधून भारतीय संघ आयर्लंडविरुद्ध मोठ्या फरकाने विजय मिळवून आपले आव्हान कायम राखेल याची शक्‍यता नाकारता येत नाही. अर्थात, अंतिम फेरी गाठण्यासाठी त्यांना हा विजय पुरेसा नाही. त्यासाठी अन्य सामन्यांचे निकालही महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. 

सामन्याचे महत्त्व लक्षात घेता भारतीय प्रशिक्षक शूअर्ड मरिने सर्व शक्‍यता पडताळून बघतील यात शंका नाही. मलेशियावरील मोठ्या विजयाने त्यांचा आत्मविश्‍वास निश्‍चित दुणावलेला असेल. मलेशियाविरुद्ध भारतीय आक्रमकांचा खेळ उल्लेखनीय ठरला होता. आयर्लंडविरुद्ध देखील आक्रमक तोच पवित्रा कायम राखतील असा विश्‍वास मरिने यांनी व्यक्त केला. 

अननुभवी खेळाडूंचे नेतृत्त्व करताना सरदार सिंगला देखील हॉकी इंडियाने जणू न कळत अखेरची संधी दिली आहे. त्यामुळे आपला सर्व अनुभव पणाला लावून सरदारला सामन्यात खेळाडूंना प्रेरित करण्यासाठी पुढाकार घ्यावा लागणार आहे. 

भारताला अंतिम फेरीची संधी कशी 

  • आयर्लंडविरुद्ध मोठा विजय आवश्‍यक 
  • ऑस्ट्रेलियाने अर्जेंटिनावर विजय मिळविले गरजेचे 
  • मलेशिया आणि इंग्लंड यांच्यातील सामना बरोबरीत सुटायला हवा 
  • उद्याच्या कार्यक्रमात भारताचा सामना दुसरा 

ऑस्ट्रेलिया वि. अर्जेंटिना (दु. 1.30)
भारत वि. आयर्लंड (द. 3.30वा.)
इंग्लंड वि. मलेशिया (सायं. 6 वा.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India A vs UAE: आशिया कप रायझिंग स्टार्समध्ये उद्या भारतासमोर यूएईचं आव्हान! सेमीफायनलचं तिकीट पणाला, वैभवच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष

COP31 Climate Summit Collapse Turkey : तुर्कीयेमधील संयुक्त राष्ट्रांची 'कॉप ३१' हवामान परिषद फिस्कटली! जीवाश्म इंधनांच्या मुद्द्यावरून मोठे मतभेद, मुख्य कराराविनाच चर्चा संपली

Manoj Jarange: मनोज जरांगें पुन्हा आक्रमक! ७ डिसेंबरपासून महाराष्ट्र दौऱ्याची घोषणा; मराठा बांधवांना काय केले आवाहन?

Latest Marathi News Live Update : पुण्यात अतिक्रमण हटवताना महापालिका अधिकाऱ्यांवर दगडफेक; सय्यदनगर-हांडेवाडीत तणाव

५ डिसेंबरला केतूचं राशीपरिवर्तन! पुढील १८ महिने ३ राशींची चांदी; बँक बॅलन्स झपाट्याने वाढणार

SCROLL FOR NEXT