residentional photo 
क्रीडा

प्रो कबड्डीमुळे मातीतला अस्सल खेळ हरवला: प्रताप शेट्टी 

श्रीकृष्ण कुलकर्णी


सिन्नर,  मराठमोळ्या कबड्डीला प्रो कबड्डीमुळे वेगळं वलय प्राप्त झालं आहे. भरपूर पैसा यातून खेळाडूला मिळू लागला आहे. मात्र कबड्डीचा मूळचा मातीतला खेळ यापासून दूर गेला आहे. असे मत छत्रपती पुरस्कार विजेते,आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक व बीपीसीएलचे संघटक आणि मुंबई उपनगर संघाचे प्रशिक्षक प्रताप शेट्टी यांनी "सकाळ'शी बोलतांना नोंदवले. 

66 व्या राज्यस्तरीय वरिष्ठ गट कबड्डी स्पर्धेत विजेतेपदाचे एक दावेदार म्हणून मुंबई उपनगर संघाकडे पाहिले जात होते. या मात्र या बलढ्य संघाला सांगली संघाकडून पराभव स्विकारावा लागला. संघाच्या स्पर्धेतील कामगिरीबद्दल बोलतांना श्री.शेट्टी म्हणाले, यजमान नाशिक विरूध्द मुंबई उपनगर ही लढत चुरीशीची झाली. आमचे कबड्डीपटू खेळात कमी पडले,तुलनेने नाशिकचा खेळ चांगलाच झाला होता. यात शंका नाही. या स्पर्धेचे आयोजन उत्तम होते, त्यामुळे बऱ्याच कालावधीनंतर ग्रामीण भागाच्या ठिकाणी आम्हाला खेळायला मिळाले. कबड्डी संघटनेने अशाप्रकारे स्पर्धेचे आयोजन करायला पाहिजे. त्यातून ग्रामीण भागात मराठमोळा कबड्डी खेळ रूजण्यास मदत होईल. आज शहरी भागात निवड चाचणी असलीतरी क्‍लब,संस्थाची संख्या हजाराच्यावर असल्याने या चाचणीत वेगवेगळे गटनिहाय सहभागी होणाऱ्या खेळाडूंची संख्याही मोठीच असते. त्यामुळे अनेकदा निवड करतांना आमची दमछाक होते. 

निवडणूक डोळ्यासमोर ठेवूनच स्पर्धा आयोजन 
ते म्हणाले, आगामी काळातील 25 नोव्हेंबरला कबड्डीची होणारी निवडणूक लक्षात घेऊनच प्रचारासाठी पदाधिकाऱ्यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते मात्र आता निवडणूकच पुढे ढकण्यात आली आहे. या कालावधीतील स्पर्धेचे नियोजन मला चूकीचे वाटते. आमच्या मुंबई उपनगर संघाला तर एक आठवड्याचा सराव करायला मिळाला. केवळ स्पर्धा घ्यायची म्हणून घ्यायची किंवा तसे नियोजन करायचे यात काही तथ्य नसते. स्पर्धेचे नियोजन हे वेळेनिहाय व योग्यपध्दतीने व्हायला हवे, खेळाडू,संघाना सरावास पुरेसा वेळ मिळायला हवा असे मला वाटते. 

नोकरी भरतीत संघाला स्थान द्यावे 
शासनातर्फे होणाऱ्या खेळाडूंच्या नोकरभरतीत प्रत्येक खेळाच्या एखाद्या,दुसऱ्या खेलाडूंला संधी मिळते,त्याऐवजी शासनाने कुठल्याही विभागात एकाचवेळी आठ ते दहा जणांचा संघ घेण्यास प्राधान्य दिले तर संबंधीत विभागाचा संपूर्ण संघच स्पर्धेत उतरेल,पर्यायाने अधिक खेळाडू राज्याला मिळतील, एक एक वर्ष प्रत्येक खेळाला संधी देता येईल,असे वाटते. त्यामुळे खेळ सुधारण्यास मदत होईल व खेळाडूही क्रीडाप्रकारांकडे आकर्षित होतील,असे मला वाटते. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शिवाजीनगर मेट्रो' स्थानकाचे नाव बदलण्यावरून वाद; फडणवीसांचा तीव्र विरोध, कर्नाटकचे CM म्हणाले, 'आम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे...'

Shivaji University : शिवाजी विद्यापीठाच्या सत्तर टक्के प्रश्नपत्रिका ‘ऑनलाईन सेट’, डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर

Chhagan Bhujbal : ‘ओबीसीतूनच आरक्षण हवे, तर इतर सर्व आरक्षण सोडणार का?’ भुजबळांचे आव्हान

Latest Marathi News Updates : विंचूर उपबाजार आवारात कांद्याला कमी भाव, संतप्त शेतकऱ्यांचा रस्ता रोको आंदोलन

वरिष्ठ गाढवाला घोडा म्हणाले तर तुम्हीही घोडाच म्हणा; सरकारी कामाबाबत गडकरींचं विधान

SCROLL FOR NEXT