Marcus Stoinis  esakal
क्रीडा

Marcus Stoinis : मार्कस स्टॉयनिस घेऊन आलाय वैयक्तिक शेफ; असं काय खातोय ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू?

अनिरुद्ध संकपाळ

Marcus Stoinis : भारतात सुरू असलेल्या वनडे वर्ल्डकपमध्ये अडखळती सुरवात करणाऱ्या ऑस्ट्रेलियाने आपली गाडी पुन्हा रूळावर आणली आहे. ते सध्या सेमी फायनलमध्ये पोहचण्याच्या मार्गावर आहेत. ऑस्ट्रेलियन संघ आपल्या फिटनेसवर जास्त भर देतात. यंदाच्या वर्ल्डकपमध्ये त्यांच्या आतापर्यंतच्या यशामागे त्यांच्या फिटनेसचा देखील वाटा मोठा आहे. ऑस्ट्रेलिया संघातील सर्वात फिट खेळाडूंच्या यादीत अष्टपैलू मार्कस स्टॉयनिसचं नाव आघाडीवर असतं.

मार्कस स्टॉयनिसने यंदाच्या वर्ल्डकपमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी एक अनोखा निर्णय घेतला आहे. तो वर्ल्डकपमध्ये वैयक्तिक शेफ घेऊन संघासोबत ट्रॅव्हेल करत आहे. मुंबईचे शेफ व्हेलटन सध्या मार्कस स्टॉयनिस सोबत वर्ल्डकपमधील व्हेन्यूवर सोबत जात आहेत. ते फ्रेंच जेवण तयार करण्यात निष्णात आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार स्टॉयनिस सध्या किटो डाएट फॉलो करतोय हे लो कार्ब डायेट आहे. तो जेवणात सध्या बेक ओट्स खातोय. हे हाय प्रोटिन डाएट आहे.

आयपीएलदरम्यान केएल राहुलनेच शेफ व्हेलटन यांची ओळख स्टॉयनिसशी करून दिली होती. स्टॉयनिसने cricket.com.au वरील अनप्लेएबल पॉडकास्टमध्ये सांगितले की, 'भारताचे काही खेळाडू हे डाएट फॉलो करतात. तेथूनच मला याची आयडिया मिळाली. मी माझ्या खाण्यापिण्याच्या बाबतीत खूप काळजी घेतो. गार्लिक नान आता डायेटमधून बाहेर आहे. ग्लुटन फ्री बनाना ब्रेड आणि शेफर्ड पाय हे डाएटमध्ये समावेश केला आहे. रोस्टेड बटर चिकन व्हेलटन यांचा त्याला फ्रेच तडका असं डाएट सुरू आहे.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Photography Competition : पर्यटनस्थळे ‘क्लिक’ करा, पाच लाखांचे बक्षीस मिळवा; शंभूराज देसाई यांची माहिती

Government Websites : सर्व सरकारी संकेतस्थळे आता होणार मराठीत!

Ashish Shelar : ठाकरेंनी आले‘पाक’ खाणे बंद करावे

CM Devendra Fadnavis : पाच लाखांवरील उपचारांसाठी निधी; उपचारांची संख्या दोन हजारांवर वाढणार

Mutual Fund: पुढील 10 वर्षांत स्मॉल-कॅप, मिड-कॅप की लार्ज-कॅप, कोणता फंड सर्वाधिक परतावा देऊ शकतो?

SCROLL FOR NEXT