Maria Sharapova1 
क्रीडा

टेनिस स्टार मारिया शारापोव्हा झाली आई; इन्स्टावर शेअर केले बाळाचे फोटो

यापूर्वी तिनं गरोदर असल्याचे फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते.

सकाळ डिजिटल टीम

वॉशिंग्टन : रशियाची माजी टेनिसपटू मारिया शारापोव्हानं तिच्या चाहत्यांना खूशखबर दिली आहे. शार्पोव्हा आई झाली असून एका गोंडस मुलाला तिनं जन्म दिला आहे. आपला पती अलेक्झांडर गिल्क्स याच्यासह बाळाचे फोटो तीनं इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत. (Maria Sharapova announces birth of her son Theodore)

सोशल मीडियावरील आपल्या या फोटोला कॅप्शन देताना शारापोव्हानं म्हटलं, आमच्या छोट्याशा कुटुंबाला सर्वांत सुंदर, आव्हानात्मक आणि छानशी भेट मिळाली आहे. आपल्या मुलाचं नामकरणंही तिनं केलं आहे. थेओदोर (Theodore) असं आपल्या मुलाचं नाव तिनं ठेवलंय. शारापोव्हा आणि अलेक्झांडर हे रशियन-ब्रिटिश कपल असून त्यांनी सन २०२० मध्ये लग्न केलं तत्पूर्वी ते दोन वर्षे एकमेकांना डेटिंग करत होते.

थेओदोरचा जन्म १ जुलै २०२२ रोजी झाला असल्याचं तिनं इन्स्टावरील मेसेजमध्ये रोमन अंकामध्ये लिहिलं आहे. शारापोव्हाने ही बातमी शेअर करताच चाहत्यांनी या जोडप्याला शुभेच्छा देण्यासाठी कमेंट सेक्शनमध्ये धाव घेतली. रशियन टेनिस स्टारनं तिचा 35 वा वाढदिवस साजरा करताना एप्रिलमध्ये आपले गरोदरपणातील फोटो शेअर केले होते.

शारापोव्हाचा पती अलेक्झांडर गिल्क्स कोण आहे?

अलेक्झांडर गिल्क्स हा मारिया शारापोव्हाचा पती असून त्याच शिक्षण इटन कॉलेज आणि ब्रिस्टल विद्यापीठात झालं आहे. अलेक्झांडर व्हेंचर स्टुडिओ स्क्वेअर सर्कलचा सह-संस्थापक आहे. मे 2012 मध्ये मेघन मार्कलची मैत्रीण मिशा नूनूसोबत त्याचं लग्न झालं होतं, परंतु सन 2016 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर सन २०१८ मध्ये मारिया शारापोव्हासोबत त्याच डिटिंग सुरु झालं. पुढे सन २०२० मध्ये अलेक्झांडर आणि शारापोव्हा यांनी लग्न केलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

एक्सप्रेसवेवर मोठा अपघात, भाजपा आमदारांच्या ताफ्यातील गाडीला ट्रकची धडक, पोलीस उपनिरीक्षकाचा मृत्यू

Maharashtra Weather: शेतकऱ्यांसाठी गुडन्यूज! विदर्भ वगळता सर्वत्र पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Karad Flyover Trial: कऱ्हाड उड्डाणपुलावरून चारचाकी हलक्या वाहनांची चाचणी वाहतूक सुरू; दोन वर्षांच्या प्रतीक्षेला अखेर विराम

IND A vs SL A: भारतीय अ संघ Tri-Series चा विजेता! वैभव सूर्यवंशीच्या वादळानंतर गोलंदाजांचा अचूक मारा, फायनलमध्ये श्रीलंका पराभूत

Krishna River Crisis: कृष्णा नदीचे दूषित पाणी आणि पाणी उपसा बंदीमुळे कोपर्डे हवेलीतील शेतकरी‑ग्रामस्थांवर दुहेरी संकट

SCROLL FOR NEXT