MS Dhoni On Marriage Invitation Card Photo  esakal
क्रीडा

MS Dhoni : धोनीचं 'वेड' काय काय करायला लावेल याचा नेम नाही! धोनीचा फोटो असलेली लग्नपत्रिका व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

MS Dhoni On Marriage Invitation Card Photo : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपवण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे आता क्रिकेट चाहत्यांना 31 मार्चपासून सुरू होणाऱ्या IPL च्या 16 व्या हंगामाचे वेध लागले आहेत. यंदाचा हा हंगाम खास असणार आहे. कारण सर्व 10 संघ आपल्या होम ग्राऊंडवर खेळणार आहेत. मात्र सीएसकेसाठी हा हंगाम भावनिक देखील असणार आहे. कारण चेन्नई सुपर किंग्जचा थला महेंद्रसिंह धोनीचा हा शेवटचा हंगाम असणार आहे.

धोनीचा हा आयपीएल हंगाम शेवटचा असल्याने त्याचे चाहते चांगलेच उत्साहात आहेत. अशाच एका उत्साही चाहत्यांचे धोनी प्रेम सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कर्नाटकच्या या चाहत्याने धोनीचा फोटो थेट आपल्या लग्नपत्रिकेवर छापून धोनी प्रेमाची हद्दच गाठली. या चाहत्याने धोनीचा जुना फोटो आपल्या लग्नपत्रिकेवर छापला. ही लग्नपत्रिका कर्नाटक धोनी फॅन्सनी सोशल मीडियावर व्हायरल केली.

चेन्नई सुपर किंग्सने त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना CSK ने लिहिले, 'थला अपडेट 7.29 मिनिटांवर'

जेव्हा चाहत्यांनी सीएसकेची ही पोस्ट पाहिली तेव्हा हृदयाचे ठोके वाढले असतील, पण त्यांनी व्हिडिओ प्ले केला तेव्हा त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. खंर तर चेन्नई सुपर किंग्जने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये धोनीच्या निवृत्तीची कोणतीही बातमी नाही, परंतु माही आगामी आयपीएल हंगामाची तयारी करताना दिसत आहे.

(Sports Latest News)

हेही वाचा : नेट बँकिंग खात्यात ठेवा कमी रक्कम...जाणून घ्या कारण

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira-Bhayandar: धक्कादायक! डब्यात मेथीची भाजी आणल्याने विद्यार्थ्याला ५० रुपयांचा दंड, मनसे आक्रमक

Gokul Election 2026 : 'अदृश्य शक्ती कोण? नाव सांगा, मग बोलते'; शौमिका महाडिक यांचे 'गोकुळ'च्या रणधुमाळीत थेट आव्हान, भाजपच्या सर्व उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत भरले अर्ज

Asian Games MMA : अवघ्या ७०० ग्रॅमने सुवर्णपदकाची संधी हुकली!; अाशियाई क्रीडा स्पर्धा ; सुचिका तारियालला मिक्स्ड मार्शल आर्ट्‌समध्ये ब्राँझपदक

Marathi News Live Updates : अमित शाह आज एएनटीएफ (ANTF) परिषदेचे उद्घाटन करणार

फुलांची आरास अन् गणपतीचं गोंडस रूप! पुण्यात या ठिकाणी आहे नाना पाटेकरांचा गणपती; राहुल देशपांडेंनी शेअर केला फोटो

SCROLL FOR NEXT