Matthew Wade Accept He Deliberately Push Mark Wood  ESAKAL
क्रीडा

Matthew Wade : हो धक्का मारला! ऑस्ट्रेलियाच्या दिग्गजाचा खळबळजनक खुलासा

अनिरुद्ध संकपाळ

Matthew Wade England vs Australia : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात गेल्या आठवड्यात खेळवण्यात आलेल्या टी 20 मालिकेत एक वादग्रस्त घटना घडली होती. ऑस्ट्रेलियाचा विकेटकिपर बॅट्समन मॅथ्यू वेडने झेलबाद होण्यापासून वाचण्यासाठी इंग्लंडचा गोलंदाज मार्क वूडला अवैधरित्या रोखले होते. या वादग्रस्त घटनेनंतर क्रिकेट वर्तुळातून खिलाडूवृत्तीबाबत जोरदार चर्चा सुरू झाली. दरम्यान, मॅथ्यू वेडने या सर्व प्रकारानंतर आता आपली प्रतिक्रिया दिली.

मॅथ्यू वेडने आपण वूड झेल पकडू नये यासाठीच त्याला धक्का मारल्याची कुबली दिली. याचबरोबर वेड पुढे म्हणाला की, जर विरोधी संघाने याबाबत पंचांकडे दाद मागितली असती तर त्याने आनंदाने मैदान सोडले असते. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड याच्यातील टी 20 सामन्यात मॅथ्यू वेडच्या बॅटला चेंडू लागून हवेत उंच उडाला होता. दरम्यान, हा झेल गोलंदाज मार्क वूड पकडू नये म्हणून मॅथ्यू वेडने त्याला हात लांब करत रोखले होते. मार्क वूड झेलही पकडू शकला नाही आणि धावबाद होण्यापासून देखील वाचला.

दरम्यान, वेडने 'द अनप्लेयेबल पॉडकास्ट' या कार्यक्रमात आपण काही चुकीचे केले नाही असे सांगितले. तो म्हणाला की, 'मी सामन्यानंतर हा व्हिडिओ पाहिला त्यावेळी मला खूप वाईट वाटले. ही घटना खूप वेगात घडली.' वेड पुढे म्हणाला की, 'मला असे वाटते की ज्यावेळी मी मैदानातून बाहेर जात होतो त्यावेळी संघ सहकारी केन रिचर्डसनने सांगितले की, तू त्याला धक्का मारलास. मी म्हणालो मला असे नाही वाटत. मग मी रिप्ले पाहिला त्यावेळी मला असे वाटले की हो मी धक्का मारला.'

वेड म्हणाला, 'सुरूवातीला मला माहिती नव्हतं की चेंडू माझ्या बॅटला लागला आहे. मला वाटले चेंडू माझ्या डोक्याला लागला आहे. मी धाव घेण्यासाठी धावलो आणि मला डेव्हिड वॉर्नरने परत पाठवले. मी मागे फिरलो त्यावेळी मला पॉईंटचा खेळाडू धावत माझ्याकडे येताना दिला. मला माहिती नाही की मी धावबाद होणार होतो की नाही, चेंडू कुठं आहे. हे सगळं असं घडलं. इंग्लंडच्या संघाने देखील अपिल केली नाही. मात्र जर इंग्लंडने अपिल केली असती तर मी त्याचा विरोध केला नसता.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT