Max ODowd Shine Netherlands Defeat Zimbabwe In His Last Super 12 Match In T20 World Cup 2022  esakal
क्रीडा

ZIM vs NED : नेदरलँडने शेवट केला गोड; पाकला लोळवणाऱ्या झुंजार झिम्बाब्वेचा केला पराभव

अनिरुद्ध संकपाळ

Netherlands Defeat Zimbabwe : नेदरलँडने टी 20 वर्ल्डकप 2022 मधील आपली मोहिम विजयाने संपवली. नेदरलँडने झुंजार झिम्बाब्वेचा 5 विकेट्स राखून पराभव केला. याचबरोबर झिम्बब्वेचे देखील स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. झिम्बाब्वेने पाकिस्तानविरूद्ध शेवटच्या चेंडूवर रोमहर्षक विजय मिळवला होता. मात्र त्याचा वर्ल्डकपमधील प्रवास हा पराभवाने संपला.

नेदरलँडकडून मॅक्स ओडोव्हडने 52 धावांची अर्धशतकी खेळी केली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेला नेदरलँडने 117 धावात गुंडाळले. नेदरलँडकडून वॅन मीकेरेनने सर्वाधिक 3 तर लीड्स, बीक आणि ग्लोव्हेर यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतला. झिम्बाब्वेकडून अष्टपैलू सिकंदर रझाने 24 चेंडूत झुंजार 40 धावांची खेळी केली.

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या झिम्बाब्वेची अवस्था मीकेरेन आणि ग्लेव्हेर यांनी 3 बाद 20 धावा अशी केली होती. त्यानंतर सेन विलियम्स आणि सिकंदर रझा यांनी डाव सावरण्यास सुरूवात केली या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी मिकेरेनने फोडली. त्याने विलियम्सला 28 धावांवर बाद केले.

यानंतर सिकंदर रझाने 24 चेंडूत 3 षटकार आणि 3 चौकारांच्या मदतीने 40 धावा ठोकल्या. त्याने संघाला शतकाच्या जवळ पोहचवले. मात्र लीड्सने त्याची खेळी 15 व्या षटकात संपवली. यानंतर नेदरलँडच्या गोलंदाजांनी उरले सुरल्या झिम्बाब्वे संघाला फारशी वळवळ न करू देता त्यांचा डाव 19.2 षटकात 117 धावात संपुष्टात आणला. अखेर 18 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर लीड्सने चौकार मारत नेदरलँडच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

यानंतर झिम्बाब्वेचे विजयासाठीचे 118 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या नेदरलँडने स्टिफन मेबर्ग (8) हा आपला सलामीवीर स्वस्तात गमावला. मात्र दुसरा सलामीवीर मॅक्स ओडोव्हडने टॉम कुपर सोबत दुसऱ्या विकेटसाठी 73 धावांची भागीदारी रचत संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले. कुपर 32 धावांवर असताना जाँग्वेने त्याला बाद केले. दरम्यान, ओडोव्हडने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला देखील शतकी मजल मारून दिली होती.

नेदरलँड विजयाच्या अगदी जवळ पोहचली असतानाच नगारवा आणि मुजारबानी झिम्बाब्वेच्या मुजारबानीने ओडोव्हडची अर्धशतकी खेळी संपवली. नगारवाने नेदलँडला दोन धक्के देत त्यांची अवस्था 2 बाद 90 धावांवरून 5 बाद 116 धावा अशी केली. अखेर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : महाराष्ट्रातील एक कोटी महिलांना लखपती बनविणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

Raj Thackeray : पुराणमतवाद्यांना शिंगावर घेणारे आजोबा! राज ठाकरेंनी शेअर केला प्रबोधनकरांसोबतचा लहानपणीचा फोटो; जयंतीनिमित्त सांगितली आठवण

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

दीड वर्षही झालं नाही आणि झी मराठीची आणखी एक मालिका घेणार निरोप? अभिनेत्रीच्या भावुक पोस्टमुळे चर्चेला उधाण

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT