Mayank Agarwal Double Century Ranji Trophy sakal
क्रीडा

Ranji Trophy: संघातुन बाहेर गेलेल्या सलामीवीराचं BCCIला चोख प्रत्युत्तर! ठोकल्या 33 चेंडूत 142 धावा

रणजीमध्ये या दिग्गज खेळाडूंनी केली दहशत...

Kiran Mahanavar

Mayank Agarwal Double Century Ranji Trophy: टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. पहिला सामना नागपुरात होत आहे.

दरम्यान, भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवाल गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय कसोटी संघातून बाहेर आहे. भारतीय निवड समितीने त्याच्याकडे सातत्याने दुर्लक्ष केले, पण मयंक अग्रवालने आपल्या फलंदाजीतुन त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.

भारतीय संघाचा सलामीवीर मयंक अग्रवालने देशांतर्गत स्पर्धांमध्ये धावा करून आपली क्षमता सिद्ध केली. रणजी ट्रॉफीच्या दुसऱ्या उपांत्य फेरीत मयंक अग्रवालने सौराष्ट्रविरुद्ध द्विशतक ठोकत भारतीय संघाचे दार ठोठावले आहे.

फिरकीला अनुकूल एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर मयंक अग्रवालने 429 चेंडूत 249 धावा केल्या. या खेळीत त्याने 28 चौकार आणि 5 षटकार मारले आहेत. म्हणजेच त्याने 33 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 142 धावा ठोकल्या. यादरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 58.04 होता.

मयंकच्या खेळीची खास गोष्ट म्हणजे त्याने येथे सौराष्ट्रविरुद्ध आपल्या संघाचा डाव सांभाळला. कर्नाटकने अवघ्या 112 धावांत पाच विकेट गमावल्या होत्या. एकीकडे कर्नाटकच्या विकेट पत्त्यांप्रमाणे पडत होत्या, तर दुसरीकडे मयंकने विरोधी विरोधी गोलंदाजांना दमवत द्विशतक ठोकले.

मयंक अग्रवालने रणजी ट्रॉफीच्या या मोसमात कर्नाटकसाठी आतापर्यंत सर्वाधिक धावा केल्या आहेत. मयंकने 2022 साली भारत आणि श्रीलंका यांच्यात भारतीय संघासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.

इतकेच नाही तर मयंकला बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये पुनरागमन करता आलेले नाही. 2020 मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT