Mayank Agarwal scores a century and India on 200 plus with 3 wickets down
Mayank Agarwal scores a century and India on 200 plus with 3 wickets down  
क्रीडा

INDvsSA : मयांकचे शतक; भारताचे दुसऱ्या सत्रात वर्चस्व

ज्ञानेश भुरे

पुणे : सलामीचा फलंदाज  मयांक अगरवाल आणि मधल्या फळीत चेतेश्वर पुजारा यांनी उपाहारानंतरचे सत्र आपल्या फलंदाजीने गाजवले. दोघांच्या फलंदाजीत कमालीचा संयम होता, पण खराब चेंडूंवरची त्यांची आक्रमकता देखील तेवढीच महत्त्वाची होती.  अर्थात संयमाच्या कसोटीत पुजारा कमी पडला. चहापानाला काहीच षटके बाकी असताना त्याने रबाडाला विकेट दिली. चहापानाला खेळ थांबला तेव्हा भारताच्या पहिल्या डावात 2 बाद  168 धावा झाल्या होत्या. मयांक 86, तर कर्णधार विराट कोहली शून्यावर खेळत होता. त्यानंतर मयांकने शतक साजरे करत 108 धावा केल्या आणि तो बाद झाला. 

उपहार ते चहापान हे दुसरे सत्र मयांक आणि चेतेश्वर यांचेच राहिले. मयांकने जणू पहिल्या कसोटीतील आपली पुढची खेळीच सुरू असल्याचे संकेत दिले. रबाडा,  फिलॅंडर, नॉर्टझे यांच्या  उसळत्या चेंडूंचा आत्मविश्वासाने सामना केला. उसळत्या चेंडूंवर त्याने मारलेले पूलचे फटके लक्षवेधक  होते. अर्धशतकानंतर त्याचा खेळ अधिक सहज झाला.त्याला चकवणे देखील पाहुण्या गोलंदाजांना जड जात होते. आफ्रिकेचा कर्णधार डु प्लेसी याने केशव महाराज याच्या फिरकीचा पूर्ण उपयोग करून घेतला. पण, उपयोगाखेरीज त्याच्या हाती  काही लागले नाही. दुसरा फिरकी गोलंदाज मुथ्थुस्वामी याला कमालीच्या उशिराने म्हणजे तब्बल 44व्या षटकांत त्याने गोलंदाजीस आणले. पण, त्याचाही फायदा झाला नाही.

त्याच्या मदतीला अखेर रबाडाच आला. त्याने भारतीय  फलंदाजांना कोंडीत पकडण्याचे अनेकदा प्रयत्न केले. त्याला मयांकने दाद दिली नाही. चेतेश्वर पुजारा मात्र रबाडाच्या गोलंदाजीवर फसला. त्याचा खोलवर टप्प्याचा चेंडू बाहेर जाणार असे वाटून पुजाराने बॅट चेंडूपासून दूर घेण्याचा प्रयत्न केला. मात्र,चेंडूने हलकीशी बॅटची किनार घेतली आणि स्लिपमध्ये डु प्लेसीने त्याचा झेल टिपला. पुजारा-मयांकने 138 धावांची भागीदारी केली. त्यानंतर चहापानाला फारसा वेळ नसल्यामुळे मयांक, विराटने धोका पत्करला नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

IPL 2024: RCB चा आनंद गगनात मावेना! प्लेऑफमध्ये पोहचताच केला जोरदार जल्लोष, पाहा Video

‘चार सौ पार’ पासून बहुमताच्या आकड्यापर्यंत

सत्ता ठरवणारा उ त्त र रं ग

SCROLL FOR NEXT