team india sakal
क्रीडा

Team India : अवघ्या एका मालिकेने 'या' फलंदाजाचे कारकीर्द उद्ध्वस्त!

एका मालिकेत खराब कामगिरी केल्यानंतरच या खेळाडूला दाखवला बाहेरचा रस्ता!

Kiran Mahanavar

Team India : टीम इंडियामध्ये खेळणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते, परंतु फार कमी खेळाडू खेळू शकतात. टीम इंडियामध्ये अलीकडच्या काळात अनेक युवा खेळाडूंना संधी दिली जात आहे, मात्र दीर्घकाळ संघात राहणे हे प्रत्येकासाठी मोठे आव्हान आहे. टीम इंडियामध्ये असा एका खेळाडू आहे, ज्याच्या चांगल्या खेळामुळे संघात समावेश करण्यात आला होता. मात्र आता हा खेळाडू टीम इंडियामध्ये संधीसाठी झगडत आहे. केवळ एकाच मालिकेतील खराब कामगिरीमुळे हा खेळाडू संघात पुनरागमन करू शकला नाही.

टीम इंडियाची अलीकडच्या काळात सलामीवीर म्हणून पहिली पसंती रोहित शर्मा आणि केएल राहुल आहेत. या दोन्ही खेळाडूंच्या उत्कृष्ट खेळामुळे सलामीवीर मयंक अग्रवालला आता संघात संधी मिळणार नाही. श्रीलंकेविरुद्ध या वर्षाच्या सुरुवातीला मयंक अग्रवालची कामगिरी खूपच खराब राहिली होती. मयंक तेव्हापासून संघाचा भाग बनू शकला नाही. भारतीय संघातून बाहेर होताच मयंक अग्रवालच्या कारकिर्दीवर संकटाचे ढग दाटलेले दिसत आहेत.

टीम इंडियाने या वर्षी जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध एकमेव कसोटी सामना खेळला होता. हा सामना सुरू होण्यापूर्वी रोहित शर्मा कोविड पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर मयंक अग्रवालचा संघात समावेश करण्यात आला होता, मात्र या सामन्यात शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांच्यावर डावाची सलामी देण्याची जबाबदारी देण्यात आली. मयंक अग्रवालला बॅकअप सलामीवीर म्हणून इंग्लंडमध्ये पाचारण करण्यात आला होता, परंतु त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. मयंक अग्रवालने भारतासाठी आतापर्यंत एकूण 21 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने या सामन्यांमध्ये 5 अर्धशतके आणि 4 शतकाच्या जोरावर 41.33 च्या सरासरीने 1488 धावा केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

महापौर असताना मुरलीधर मोहोळ बिल्डरची गाडी वापरायचे? रविंद्र धंगेकरांचा आणखी एक खळबळजनक आरोप; गाडीचा फोटो अन् नंबरही सांगितला...

AI Greeting Cards: तंत्रज्ञानाच्या युगात भावनाही झाल्या डिजिटल; शब्दांऐवजी डिजिटल पत्राद्वारे भावना व्यक्त

Latest Marathi News Live Update : पुढील तीन दिवस नाशिकसह घाट परिसराला यलो अलर्ट; हवामान विभागाचा इशारा

Arun Gawli Mumbai : अरूण गवळीनंतर आता मुलग्याची दहशत, जमीन व्यवहारात कोट्यावधींची फसवणूक; कोर्टाकडून अटक करण्याचे आदेश

CM Devendra Fadnavis: काँग्रेस आता अती डाव्या विचारांकडे झुकली मुख्यमंत्री : संवैधानिक संस्थांविषयी नकारात्मकता धोकादायक

SCROLL FOR NEXT