Mc Mary Kom Steps Down As Paris Olympics Chef De Mission esakal
क्रीडा

Mc Mary Kom : पीटी उशांना पत्र लिहीत मेरी कॉमने अचानक सोडले पॅरिस ऑलिम्पिकचे चिफ दे मिशनचं पद

अनिरुद्ध संकपाळ

Mc Mary Kom Steps Down As Paris Olympics Chef De Mission : तब्बल सहा वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेली भारताची बॉक्सर एमसी मेरी कॉमने शुक्रवारी पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारताच्या अभियानाचे प्रमुख पद सोडलं. मेरी कॉमने भारतीय ऑलिम्पिक संघाची अध्यक्ष पीटी उशा यांना पत्र लिहूलन आपण वैयक्तिक कारणामुळे हे पद सोडत असल्याचे सांगितले.

मेरी कॉमने पत्रात लिहिले की, 'देशाची कोणत्याही स्वरूपात सेवा करणे ही अभिमानाची बाब असते. मी हे पद स्विकारण्यासाठी मानसिकदृष्ट्या तयार होते. मात्र मला खेदपूर्वक सांगाव लागतंय की मी ही जबाबदारी घेऊ शकत नाही. मी वैय्यक्तिक कारणामुळे हे पद सोडत आले.'

मेर कॉम पुढे लिहिले की, 'या प्रकारे मी या जबाबदारीपासून मागे हटत आहे याची शरम वाटते. मी कधी असे करत नाही. मात्र आता माझ्याकडे कोणताच पर्याय नाहीये. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या आपल्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम मी कायम करेन.'

आयओएने 21 मार्चला मेरी कॉमची या पदावर नियुक्ती केली होती. लंडन ऑलिम्पिकमध्ये मेरी कॉमने कांस्य पदक जिंकले होते. 26 जुलै ते 11 ऑगस्ट या दरम्यान होणाऱ्या ऑलिम्पिक खेळात भारतीय संघाची ती अभियान प्रमुख होती.

याबाबत पीटी उशा यांनी सांगितले की, 'ऑलिम्पिक पदक विजेती बॉक्सर आणि आयओए अॅथलिट आयोगाची प्रमुख मेरी कॉमला वैयक्तीक कारणामुळे या पदावरून हटावे लागत आहे याचा आम्हाला खेद आहे. आम्ही तिच्या या निर्णयाचा आणि वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करतो. मेरी कॉमच्या पर्यायाबद्दल लवकरच घोषणा केली जाईल.

मी तिच्या विनंतीचा मान ठेवते. मी मेरी कॉमला सांगितले की आयओए आणि माझा कायम तिला पाठिंबा राहणार आहे. मी सर्वांना तिच्या वैयक्तिक आयुष्याचा सन्मान करण्याची विनंती करते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cheteshwar Pujara Retire: भारताचा 'टेस्ट स्पेशालिस्ट' निवृत्त! पुजाराने केली मोठी घोषणा; म्हणाला, 'प्रत्येक चांगली गोष्ट...'

Latest Marathi News Updates : सांगोला तालुक्यात लांडग्यांचा कहर!

'जर कोणी माझ्यासाठी या दोन गोष्टी केल्या, तर मी आयुष्यात कधीच दक्षिणा घेणार नाही'; बागेश्वर बाबांचे मोठे विधान

Viral Video : महिलेने वाचविलेला जीव, अनेक वर्षांनी दिसताच सिंहांनी मारली मिठी, हृदयस्पर्शी व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यांत येईल पाणी

Thalapathy Vijay चा मेगा ब्लॉकबस्टर शो! Modi च्या सभेपेक्षा जास्त गर्दी, पडद्यावरून थेट मैदानात कसा आला?

SCROLL FOR NEXT