Rishabh Pant Esakal
क्रीडा

Rishabh Pant Accident: पंतची प्लास्टिक सर्जरी, डोके अन् मणक्याचा MRI आला समोर... जाणून घ्या अपडेट

ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघात

सकाळ डिजिटल टीम

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज ऋषभ पंतच्या कारला शुक्रवारी पहाटे एका भीषण अपघातात झाला. पंत उत्तराखंडमधील रुरकी या त्यांच्या मूळ गावी जात असताना त्यांची कार मंगलोरजवळ दुभाजकाला धडकली. पंत स्वतः कार चालवत होता. सध्या ऋषभ पंतवर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्याच्या अनेक तपासण्याही येथे झाल्या आहेत.

पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले आहे. ज्याचा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला आहे. सर्व रिपोर्ट नॉर्मल आले आहे.

डॉक्टरांनी सांगितले की, ऋषभ पंतच्या अजून अनेक चाचण्या करायच्या बाकी आहेत. त्याच्या घोट्याचा आणि गुडघ्याचा एमआरआय स्कॅनही करायचा होता. पण पंतला खूप दुखत होते आणि सूजही येत असल्याने ती पुढे ढकलण्यात आली आहे. आता हे स्कॅन आज (31 डिसेंबर) करण्यात येणार आहे.

कार अपघातात ऋषभ पंतच्या चेहऱ्याला दुखापत झाली होती. अनेक जखमा आणि काही ओरखडेही आले. त्यानंतर पंतने प्लास्टिक सर्जरीही केली आहे. ऋषभ पंतला उजव्या गुडघा आणि घोट्यात सूज आणि त्रास होत असू शकते. याच कारणामुळे डॉक्टरांनी ऋषभ पंतच्या गुडघ्यावरही पट्टी बांधली आहे. डॉक्टरांनी सांगितले की, पंत यांची प्रकृती आता स्थिर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar: अखेर वेळ ठरली! नितीश कुमार राजीनामा देणार; तारीख आली समोर, बिहारमध्ये २० वर्षांनंतर बदलाची चाहूल

IPL 2020 Point Table : विदर्भच्या पोट्ट्याने राजस्थानची 'वाट' लावली! Praful Hingeने इतिहास घडवताना हैदराबादला मिळवून दिला दणदणीत विजय, गुणतालिकेत बदल

Pune Accident: पुण्यात थरारक घटना! मद्यपी चालकाने तरुणाला फरफटत नेऊन चिरडले; हडपसर-सासवड रस्त्यावरील घटना, चालकाला अटक!

Mohol Crime: छळातून दुर्दैवी अंत; मोहोळमध्ये नवविवाहितेचा खून, नवरा व सासूला चार दिवसांची कोठडी!

तापमान ४२ अंशावर! ‘ही’ फळे खावा, नैसर्गिक पेये, आंबिल प्या; लहान मुलांची 'अशी' घ्या काळजी, वाचा...

SCROLL FOR NEXT