Men Badminton Doubles India Won Gold Medal In Commonwealth Games 2022  esakal
क्रीडा

CWG 2022 : बॅडमिंटनमध्ये सुवर्ण पदकांची हॅट्रिक; पुरूष दुहेरीतही जिंकले गोल्ड

अनिरुद्ध संकपाळ

Commonwealth Games 2022 Men's Double Badminton : भारताने बॅडमिंटन पुरूष दुहेरीत इंग्लंडचा 21 - 15, 21-13 गेम्सने पराभव करत भारताला बॅडमिंटनमधील तिसरे सुवर्ण पदक मिळवून दिले. भारताच्या सात्विक साईराज रंकरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने इंग्लंडच्या बेन लॅन आणि सिअन वेंडीचा पराभव करत सुवर्ण पदकावर नाव कोरले.

भारताच्या सात्विक आणि चिरागने पहिल्या गेममध्ये 21 - 15 असा जिंकला. पहिल्या गेममध्ये इंग्लंडच्या लॅन आणि वेंडीने सुरूवातीला सात्विक आणि चिरागच्या तोडीस तोड खेळ करत सामना नेक टू नेक ठेवला. मात्र पहिल्या गेमच्या दुसऱ्या भागात भारताच्या चिराग आणि सात्विकने आघाडी घेत पहिला गेम 21 - 15 असा जिंकला.

त्यानंतर दुसऱ्या गेममध्ये यजमान इंग्लंडच्या लॅन आणि वेंडीने चांगली सुरूवात केली. मात्र भारताने 3 - 2 अशी एका गुणांची आघाडी घेतली होती. भारतीय जोडीने ही आघाडी दुसऱ्या गेमच्या मध्यापर्यंत 11 - 10 अशी नेली. दुसऱ्या गेममध्ये ऑस्ट्रेलियाच्या जोडीने आक्रमक झुंजार खेळ करत भारताला मोठी आघाडी मिळू दिली नाही.

मात्र दुसऱ्या गेमच्या दुसऱ्या हाफमध्ये चिराग आणि सात्विकने जोरदार खेळ करत आघाडी 17 - 11 अशी वाढवत दुसऱ्या गेमवर तसेच सामन्यावरही आपली पकड मजबूत केली. त्यानंतर चिराग आणि सात्विकने इंग्लंडच्या लॅन आणि वेंडीविरूद्ध दुसरा गेम देखील 21 - 13 असा जिंकत सामना आणि गोल्ड मेडल खिशात टाकले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Traffic Alert : संकष्टी चतुर्थीला दगडूशेठ गणपती दर्शनाला जाताय? उद्या सकाळी 7 पासून पुण्याच्या मध्यवर्ती भागात वाहतुकीत मोठे बदल; पाहा पर्यायी मार्ग

Pune Metro: हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचा पहिला टप्पा जुलै महिन्यात सुरू व्हावा: आमदार सिद्धार्थ शिरोळे, विधानसभेत उठवला आवाज!

Mumbai Manhole News: 'तेच घर चालवत होते, आमचा एकमेव आधार गेला...'; मॅनहोलमध्ये पडून असलम शेख यांचा मृत्यू; कुटुंबाचा न्यायासाठी आक्रोश

श्रेयस तळपदेचं घर पाहिलंत का? भलीमोठी बाल्कनी अन् ५० वर्ष जुनी भांडी, पाहा आतले सुंदर फोटो!

Latest Marathi News Live Update : पश्चिम आशियातील संकटामुळे एप्रिल-जून दरम्यान इंधन विक्रीतून तेल कंपन्यांचे सुमारे ७५,००० कोटी रुपयांचे नुकसान झाले: हरदीप पुरी

SCROLL FOR NEXT