Men’s Asia Cup hockey 2022 
क्रीडा

गतविजेत्या भारताचे लक्ष्य अंतिम फेरीचे; संघासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान

भारतीय संघ विजय मिळवून इतर लढतीच्या निकालावर अवलंबून न राहता थेट अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही.

सकाळ ऑनलाईन टीम

Men’s Asia Cup hockey 2022 : गतविजेता भारतीय पुरुष हॉकी संघाने ‘सुपर फोर’ फेरीतील पहिल्या लढतीत जपानला हरवले, तर दुसऱ्या लढतीत मलेशियाशी बरोबरी साधली. आता आज होणाऱ्या अखेरच्या लढतीत भारतीय संघासमोर दक्षिण कोरियाचे आव्हान असणार आहे. या वेळी भारतीय संघ विजय मिळवून इतर लढतीच्या निकालावर अवलंबून न राहता थेट अंतिम फेरीत पात्र ठरण्यासाठी सर्वस्व पणाला लावेल यात शंका नाही.

दक्षिण कोरियाचा संघ ४ गुणांसह सरस गोल फरकाच्या जोरावर गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. भारतीय संघ ४ गुणांसह दुसऱ्या स्थानावर विराजमान आहे. फायनलसाठीची समीकरणे

१) भारतीय संघाने दक्षिण कोरियाला हरवल्यास भारताचा संघ अंतिम फेरीत पोहोचणार हे निश्‍चित होईल. जपान - मलेशिया यांच्यामधील लढतीचा निकाल कोणताही लागला, तरी भारतीय संघाला धोका नाही.

२) मलेशियाने जपानला हरवले आणि दक्षिण कोरियाने भारताला हरवले, तर भारताचे आव्हान संपुष्टात.

३) जपानने मलेशियाला हरवले व भारत-कोरियामध्ये बरोबरी झाल्यास, भारत व कोरिया अंतिम फेरीत.

४) भारत - कोरिया यांच्यामध्ये बरोबरी झाली आणि मलेशियाने जपानला हरवल्यास, अशा वेळी या तिन्ही देशांचे समान ५ गुण होतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ganpatipule Development Plan : गणपतीपुळेचा विकास आराखडा 7 वर्षांपासून कागदावरच! पालकमंत्री उदय सामंतांच्या बैठकीत काय निर्णय होणार?

यशचा डबल रोल, दमदार अ‍ॅक्शन अन् जबरदस्त स्टाईल; ‘Toxic’ किती भावला? पण ३ तास १४ मिनिटांचा सिनेमा करतो बोअर!

Pune Crime: श्रावणात दारू पिऊन घरी आला अन् मटणाची मागणी केली ; वडिलांच्या मारहाणीत मुलाचा मृत्यू

Marathi News Live Updates : ई-चलनाविरोधातील आमरण उपोषण तात्पुरते स्थगित; दोन आठवड्यांत निर्णय न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा

Plastic Scrap Fire: प्लास्टिकच्या साठ्याला हवा नियमांचा अंकुश अग्निप्रतिबंधक, प्रदूषण नियंत्रण परवानगी सक्तीची करण्याची मागणी

SCROLL FOR NEXT