Mexico Open Tennis Player Alexander Zverev Fined
Mexico Open Tennis Player Alexander Zverev Fined  esakal
क्रीडा

Mexico Open: झ्वेरेव्हला रॅकेट आपटणं तब्बल 30 लाखाला पडलं

सकाळ डिजिटल टीम

जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असणाऱ्या टेनिसपटू अलेक्झांडर झ्वेरेव्हला (Alexander Zverev) मॅक्सिको ओपनमधील (Mexico Open) आपली एक चूक फारच महागात पडत आहे. त्याने मॅक्सिको ओपनमधील पुरूष दुहेरी सामन्यात अंपायरच्या निर्णयाचा राग त्याच्या खुर्चीवर काढला होता. त्याने एक नाही अनेकवेळा त्याची टेनिस रॅकेट (Tennis Racquet) अंपायर बसलेल्या खुर्चीवर (Umpire Chair) जोरात आपटली होती. त्यात त्याची रॅकेट देखील तुटली. दरम्यान, या अखिलाडूवृत्तीची शिक्षा अलेक्झांडरला भोगावी लागली. त्याला स्पर्धेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. तसेच त्याला 40,000 डॉलर्स म्हणजे तब्बल 30 लाख रूपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

याबाबत एटीपीने (Association of Tennis Professionals) अधिकृत वक्तव्य प्रसिद्ध केले. त्यात 'अलेक्झांडरला त्याच्या वर्तनुकीसाठी जास्तीजास्त दंड आकारण्यात आला आहे. याचबरोबर झ्वेरेव्हला सिंगल्स आणि डबल्स सामन्यातून मिळालेली 31570 डॉलरची रक्कम देखील गमवावी लागणार आहे. तसेच त्याला या स्पर्धेतून मिळेल्या सर्व एटीपी रँकिंग पाँईटपासून देखील हात धुवावा लागणार आहे. या प्रकाराची एटीपीच्या नियमांनुसार पडताळणी होणार आहे.' असे सांगण्यात आले.

जर्मनीच्या अलेक्झांडर झ्वेरेव्हने टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते. तो मॅक्सिको ओपन स्पर्धेत ब्राझीलच्या पार्टनर मार्केलो मेलो सोबत खेळताना 6-2, 4-6, 10-6 असा पारभूत झाला होता. त्याला ब्रिटनच्या लॉईड ग्लासपूल आणि फिनलँडच्या हॅरी हेलिओवारा जोडीने पराभूत केले होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Forbes 30 Under 30: फोर्ब्सने '30 अंडर 30 एशिया' यादी केली जाहीर; 'या' भारतीयांनी मिळवले स्थान

MLA Raju Patil : आजची सभा ही अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्यावेळी होणाऱ्या सभांची आठवण करून देणार

Mumbai Lok Sabha: मुंबईत मुस्लीम मतदार कोणाच्या बाजूने? ठाकरेंना होणार फायदा?

Rohit Sharma Hardik Pandya : पुढच्या हंगामात रोहित अन् हार्दिक दोघांना मिळणार नारळ? भारताच्या दिग्गजाला म्हणायचं तरी काय?

Latest Marathi News Live Update : मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या कार्यालयात नियंत्रण कक्ष कार्यान्वित

SCROLL FOR NEXT