WPL 2023 Winner Prize Money Crores of rupees will rain on the winner and runner-up Latest Cricket News in marathi kgm00 sakal
क्रीडा

WPL 2023 Winner Prize Money: विजेत्यावर पडणार करोडो रुपयांचा पाऊस! जाणुन घ्या कोणाला किती मिळणार

Kiran Mahanavar

WPL 2023 Winner Prize Money DC vs MI : महिला प्रीमियर लीगची पहिली आवृत्ती अंतिम टप्प्यात आली आहे. मॅग लॅनिंगच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्स आणि हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स रविवारी विजेतेपदासाठी आमनेसामने असतील. विजेत्या आणि उपविजेत्या संघावर करोडो रुपयांचा पाऊस आहे. कोणाला किती मिळणार जाणुन घ्या....

दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील अंतिम सामना रविवारी संध्याकाळी 7.30 वाजता होणार आहे. दिल्ली कॅपिटल्सचे नेतृत्व मॅग लॅनिंगकडे आहे, जे ऑस्ट्रेलियाची सर्वात यशस्वी कर्णधार आहे. या स्पर्धेतही तिचा अनुभव दिसून आला, तिने संघाचे चांगले नेतृत्व केले आणि संघ अंतिम फेरीत पोहोचला. गटात हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी राहिला.

दिल्लीने ग्रुप स्टेजमध्ये खेळल्या गेलेल्या 8 पैकी 6 सामने जिंकले आणि 2 गमावले. मुंबई इंडियन्सने गट टप्प्यात 8 सामने खेळले, त्यापैकी 6 जिंकले आणि 2 गमावले. पण नेट रनरेटनुसार ती दुसऱ्या स्थानावर राहिली आणि त्यामुळे तिला एलिमिनेटर सामना खेळावा लागला. येथे मुंबई इंडियन्सने यूपी वॉरियर्सवर 72 धावांनी मोठा विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.

  • WPL 2023 चे विजेते बक्षीस रक्कम

    महिला प्रीमियर लीगच्या पहिल्या आवृत्तीतील विजेत्या संघाला बक्षीस म्हणून 6 कोटी रुपये दिले जातील.

  • WPL 2023 रनर-अप बक्षीस रक्कम

    जो संघ दिल्ली कॅपिटल्स किंवा मुंबई इंडियन्समध्ये हरेल, त्याला उपविजेता बक्षीस म्हणून ३ कोटी रुपये दिले जातील.

  • तिसऱ्या स्थानासाठी WPL 2023 बक्षीस रक्कम

    यूपी वॉरियर्सने स्पर्धेचा शेवट तिसऱ्या स्थानावर केला. गुणतालिकेत तिसर्‍या स्थानावर असलेल्या यूपीने 8 पैकी 4 सामने जिंकले होते आणि तेवढ्याच सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. प्लेऑफमध्ये स्थान मिळवणाऱ्या यूपी वॉरियर्सला एलिमिनेटर सामन्यात मुंबईकडून दारुण पराभव पत्करावा लागला. यूपी तिसऱ्या क्रमांकाचा संघ होता, त्याला एक कोटी रुपयांची बक्षीस रक्कम देण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Saif Ali Khan : सैफ अली खानला मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला मोठा धक्का!

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

WI vs AUS: ६ पावलं पळाला, स्वतःला दिलं झोकून; Pat Cummins चा अविश्वसनीय झेल, Viral Video नक्की पाहा

Miraj News : कौटुंबिक वादातून कीटकनाशक पिवून पिता पुत्राने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT