mirabai chanu olympics 2024  sakal
क्रीडा

Mirabai Chanuला सलग दुसऱ्या पदकाचे वेध! टोकियोनंतर पॅरिसमध्येही इतिहास रचण्यासाठी सज्ज; किती वाजता रंगणार सामना?

टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिल्याच दिवशी भारताला पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज मैदानात उतरणार आहे. महिला विभागातील ४९ किलो वजनी गटात मीराबाई पदकासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

Kiran Mahanavar

टोकियो ऑलिंपिकमध्ये पहिल्याच दिवशी भारताला पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू पॅरिस ऑलिंपिकमध्ये आज मैदानात उतरणार आहे. महिला विभागातील ४९ किलो वजनी गटात मीराबाई पदकासाठी सर्वस्व पणाला लावताना दिसेल.

दोन ऑलिंपिकमध्ये पदक जिंकणारी पहिली भारतीय वेटलिफ्टर म्हणून तिला इतिहास रचण्याची संधी आहे, मात्र पदक व तिच्यामध्ये तंदुरुस्तीची भिंत आहे. तंदुरुस्तीवर मात करीत ती सलग दुसरे पदक पटकावण्याची संस्मरणीय कामगिरी करतेय का, याचे उत्तर आज मिळेल.

मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिंपिकमध्ये एकूण २०२ किलो (८७+११५) वजन उचलून रौप्यपदक पटकावले होते. त्यानंतर २०२२ मधील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिने २०१ किलो (८८+११३) वजन उचलले होते. मीराबाई हिच्याकडून यंदाही पदकाची आशा बाळगता येणार आहे, पण यंदा तिच्या पदकाचा रंग कोणता असेल याबाबत अनिश्‍चितता आहे.

कारण पाच महिन्यांच्या दुखापतीनंतर तिने पुनरागमन केले आहे. तिचे प्रशिक्षक विजय शर्मा यांनी मीराबाई पूर्णपणे तंदुरुस्त असल्याचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, यंदा पॅरिसमध्ये मीराबाई २०२ किलोपर्यंत थांबणार नाही. २०५ ते २०६ किलोपर्यंत ती मजल मारू शकते.

गत सुवर्णपदक विजेतीचा सहभाग

चीनची ऑलिंपिक विजेती खेळाडू होऊ झिहुई ही यंदा पॅरिस ऑलिंपिकमध्येही सहभागी होणार आहे. त्यामुळे टोकियोत पहिला क्रमांक पटकावणारी होऊ हीच सुवर्णपदकासाठी प्रबळ दावेदार असणार आहे. उत्तर कोरियाच्या रि साँग गम हिने पॅरिसमध्ये सहभाग घेतलेला नाही. जागतिक विक्रम तिच्या नावावर आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेतही ती विजेती ठरली होती, मात्र तिच्या अनुपस्थितीनंतरही ४९ किलो वजनी गटात चुरस आहे. अमेरिकेची जॉर्डन डेलाक्रूझ, थायलंडची सुरोदचाना खाम्बाओ, रुमानियाची माहेला कॅम्बेई या स्टार खेळाडूंच्या समावेशामुळे ४९ किलो वजनी गटात पदकासाठी संघर्ष पाहायला मिळू शकतो.

स्नॅचमध्ये ९० किलो वजन उचलण्याचे आव्हान

मीराबाई चानू यंदा पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे, मात्र ती नुकतीच दुखापतीमधून बाहेर आली आहे. त्यामुळे तिच्याकडून यंदा लक्षणीय कामगिरी होईल की नाही याबाबत सांशकता आहे. रौप्य किंवा ब्राँझ यापैकी एका पदकासाठी तिची दावेदारी असेल, अशी चर्चाही रंगू लागली आहे, पण क्लीन अँड जर्क यामध्ये ११९ किलो वजन उचलणारी मीराबाई हिला स्नॅच प्रकारात अद्याप ९० किलो वजनाचा टप्पा ओलांडता आला नाही, मात्र तिच्या चार प्रतिस्पर्धी खेळाडूंनी ९० किलो वजन अगदी सहज उचलले आहे. त्यामुळे यंदा मीराबाईसमोर खडतर आव्हान असणार आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

वेटलिफ्टींग

महिला ४९ किलो

(मिराबाई चानू - रात्री ११ वाजता)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT