Misbah-Ul-Haq-Pakistan-Coach 
क्रीडा

वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पाकिस्तानचे कोच कोरोना पॉझिटिव्ह

विराज भागवत

कोच सोडून इतर कोणालाही कोरोनाची लागण नाही

जमैका: पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक (Pakistan Head Coach) मिस्बाह उल हक (Misbah-Ul-Haq) याला वेस्ट इंडिज दौऱ्यावर (Windies Tour) असताना कोरोनाची (Covid-19) लागण झाली. जमैकामध्ये सध्या पाकिस्तानचा संघ क्रिकेट मालिका (Cricket Series) खेळत असून मिस्बाह त्या संघासोबत आहे. त्याच वेळी त्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आला आहे. दोन सामन्यांची विंडिज-पाकिस्तान (WI vs PAK) कसोटी मालिका नुकतीच संपली. त्यानंतर मिस्बाहचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह (Reports) आल्याची माहिती आहे. कसोटी मालिका संपल्यानंतर मिस्बाह पाकिस्तानच्या संघासोबत पाकिस्तानला परतणार होता, पण आता मात्र त्याला जमैकामध्येच (Jamaica) थांबावं लागणार आहे. १० दिवस विलगीकरणात (Isolation) राहिल्यानंतर त्याची पुन्हा टेस्ट (Test) केली जाईल आणि त्यानंतरच त्याला मायदेशी परतण्याची परवानगी देण्यात येईल.

पाकिस्तान क्रिकेट बोर्ड मिस्बाह उल हक यांच्या प्रकृतीबद्दलच्या अपडेट्ससाठी विंडिजच्या क्रिकेट बोर्डाशी सतत संपर्कात आहे. मिस्बाहला दुसऱ्या हॉटेलमध्ये हलवण्यात येणार असून तिथे तो १० दिवसांच्या आयसोलेशनमध्ये असणार आहे. या १० दिवसांच्या कालावधीत क्वारंटाइन असलेल्या मिस्बाहच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्यासाठी एक वैद्यकीय तज्ज्ञदेखील तैनात करण्यात आला आहे. मिस्बाह लवकर तंदुरूस्त होईल", अशी माहिती पाक क्रिकेट बोर्डाने दिली. जमैकाला असलेल्या संपूर्ण पाकिस्तान चमूतील केवळ मिस्बाहलाच कोरोनाची बाधा झाली आहे. बाकी कोणालाही कोरोना झालेला नाही.

पाकिस्तानी संघाचा विंडिज नुकताच संपला. टी२० मालिकेने दौऱ्याचा प्रारंभ झाला, पण चार पैकी तीन सामने पावसामुळे रद्द झाले. पहिला सामना १५ षटकांच्या खेळानंतर थांबला. तर तिसरा आणि चौथा सामना पाच षटकांपर्यंतही पोहोचू शकला नाही. केवळ दुसरा टी२० सामना पूर्ण खेळला गेला. त्यात पाकिस्तानने १५७ धावांचा यशस्वी बचाव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: जे बाळासाहेब ठाकरेंना जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं, राज ठाकरेंकडून भाषणाच्या सुरुवातीलाच मुख्यमंत्र्यांवर टीका

Latest Maharashtra News Updates : सन्माननीय उद्धव ठाकरे...म्हणत राज ठाकरेंची भाषणाला सुरुवात...

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

SCROLL FOR NEXT