Mitchell Johnson on David Warner marathi news sakal
क्रीडा

Johnson vs Warner : ऑस्ट्रेलियातलं सर्वात मोठं स्कँडल केलेल्या.... डेव्हिड वॉर्नरच्या सेंड ऑफवर जॉन्सन भडकला

Kiran Mahanavar

Mitchell Johnson on David Warner : ऑस्ट्रेलियाचा सलामीचा फलंदाज डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धची शेवटची कसोटी मालिका खेळताना दिसणार आहे. या मालिकेनंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. मात्र, या मालिकेतील कोणता सामना त्याचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना असेल हे निश्चित झालेले नाही. आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याच्या निरोप समारंभाची तयारी केली आहे.

14 डिसेंबरपासून पर्थ येथे सुरू होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणारी पुढील कसोटीही तो खेळू शकेल अशी अपेक्षा आहे. मात्र, ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनने डेव्हिड वॉर्नरला फेअरवेल मालिकेत खेळण्याची संधी दिल्यानंतर त्यांच्यावर टीका करत अनेक मोठे वक्तव्य केले आहे.

जॉन्सनने द वेस्ट ऑस्ट्रेलियनसाठी आपल्या कॉलममध्ये लिहिले की, आम्ही डेव्हिड वॉर्नरच्या फेअरवेल मालिकेची तयारी का करत आहे, हे मला कोणी सांगू शकेल का? कारण फॉर्ममध्ये नसलेल्या खेळाडूला निवृत्तीची तारीख ठरवण्याची संधी का मिळाली आहे? आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठ्या स्कँडल अडकलेल्या खेळाडूला हिरोचा निरोप का मिळतो आणि त्याने का करावे?

सँडपेपर गेट घोटाळ्यात केवळ वॉर्नरलाच फटकारले नाही, तर स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनाही क्रिकेट ऑस्ट्रेलियाने शिक्षा केली होती. या घटनेनंतर निलंबन संपल्यानंतरही स्मिथ आणि वॉर्नर यांना कर्णधारपदापासून वंचित ठेवण्यात आले होते.

जॉन्सनने ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डावरही प्रश्न उपस्थित केले आणि त्यावेळी केवळ वॉर्नरचा सँडपेपर घोटाळ्यात सहभाग नव्हता असे सांगितले. त्यावेळी तो संघातील वरिष्ठ खेळाडूही होता, पण तो वॉर्नरच्या कारकिर्दीतील सर्वात मोठा डाग आहे आणि असे असतानाही तो अशा निरोपाला कसा पात्र ठरला. वॉर्नरने गेल्या वर्षीच जाहीर केले होते की तो या वर्षाच्या अखेरीस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहे, परंतु तो शेवटचा सामना कधी आणि कुठे खेळणार हे अद्याप निश्चित झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Education News : टीईटी परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास नोकरी सोडावी लागणार; शिक्षकांमध्ये भीतीचे वातावरण

'एक दिवाने की दिवानियत' चित्रपटाच्या डबिंगदरम्यान रडला हर्षवर्धन राणे

Athletics Championships: नीरज-अर्शदकडून निराशा, पण भारताच्या सचिनचं पदक फक्त ४० सेंटीमीटरने हुकलं; जाणून कोण ठरलं विजेता

Agriculture News : 'शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी उद्ध्वस्त'; कांदा उत्पादकांकडून थेट सरकारला जाब

Latest Maharashtra News Updates : तृतीयपंथी कल्याणकारी महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन संजय शिरसाठ यांची हकालपट्टी करा, तृतीयपंथी संघटनांची मागणी

SCROLL FOR NEXT