Mitchell Marsh named as Australia's new T20 captain  
क्रीडा

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मोठी उलथापालथ! कर्णधार पदावरून 'या' खेळाडूंची हकालपट्टी, मिळाला नवीन कर्णधार

Kiran Mahanavar

Mitchell Marsh named as Australia's new T20 captain : ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये मिचेल मार्शवर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्याला आता टी-20 संघाचा नवा कर्णधार बनवण्यात आला आहे. टी-20 विश्वचषक सुरू होण्यास 12 महिन्यांहून कमी कालावधी शिल्लक असताना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयानंतर पुढील टी-20 विश्वचषकाच्या दृष्टीने कांगारू संघाने तयारीच्या दिशेने पहिले पाऊल टाकले आहे. नवा कर्णधार म्हणून मिचेल मार्श मॅथ्यू वेडची जागा घेईल.

मॅथ्यू वेडच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने आपला शेवटचा टी-20 सामना गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध खेळला होता. आता त्यांची कर्णधार पदावरून हकालपट्टी करत मिचेल मार्श नवा कर्णधार करण्यात आले आहे. अफगाणिस्तानविरुद्ध त्या सामन्यात मिचेल मार्शही संघाचा भाग होता. मार्शने कर्णधार होण्यापूर्वी टी-20 खेळाडू म्हणून शेवटच्या सामन्यात 30 चेंडूत 45 धावा केल्या होत्या. पण, आता तो केवळ टी-20 संघाचा खेळाडूंच नसून कर्णधारही असणार आहे.

मिचेल मार्शची टी-20 कारकीर्द

ऑस्ट्रेलियन अष्टपैलू मिचेल मार्शने आतापर्यंत 46 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 1086 धावा करण्यासोबतच 15 विकेट्स घेतल्या आहेत. जिथे त्याने बॅटने 6 अर्धशतके झळकावली आहेत.

कर्णधार म्हणून मिचेल मार्श दक्षिण आफ्रिका दौऱ्यापासून संघाची धुरा सांभाळणार आहे. 30 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात ऑस्ट्रेलियाला 5 एकदिवसीय आणि 3 टी-20 सामने खेळायचे आहेत.

मिचेल मार्शची टी-20 कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करणारा तो 12 वा खेळाडू असेल. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापर्यंत पॅट कमिन्स मनगटाच्या दुखापतीतून सावरला नाही, तर मिचेल मार्श वनडेतही कर्णधारपद भूषवताना दिसणार आहे, अशीही बातमी आहे.

ऑस्ट्रेलियाला डर्बनमध्ये दक्षिण आफ्रिकेत तिन्ही टी-20 सामने खेळायचे आहेत. हे सामने 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर या कालावधीत खेळवले जातील. त्यानंतर एकदिवसीय मालिका होणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघ निवडीचा प्रश्न आहे, तो 28 सप्टेंबरपूर्वी निवडला जाऊ शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai vs Vidarbha T20: आयुष म्हात्रे ऑन फायर! ८ षटकारांसह शतक अन सूर्या-दुबेची साथ; मुंबईचा विदर्भाविरुद्ध मोठा विजय

Mumbai Water Supply: मुंबईत १ आणि २ डिसेंबरला पाणी संकट! 'या' भागात पाणीपुरवठा विस्कळीत राहणार; तुमचा परिसर यादीत आहे का?

Aquarius Love Horoscope 2026: मार्च, जून अन् ऑक्टोबरचे गुरु गोचर बदलतील तुमची लव लाइफ; 2026मध्ये असं असेल कुंभ राशीचं भविष्य

School Holiday: राज्यात 5 डिसेंबरला सर्व शाळा बंद राहणार; जाणून घ्या कारण काय

Latest Marathi News Live Update: दहिसर परिसरात अनेक घरांमध्ये चोरी, सीसीटीव्ही फुटेज समोर

SCROLL FOR NEXT