Mitchell Marsh COVID-19  esakal
क्रीडा

Mitchell Marsh COVID-19 : मिचेल मार्श कोरोना पॉझिटिव्ह असूनही करणार नेतृत्व; काय आहेत ऑस्ट्रेलियाचे प्रोटोकॉल?

Mitchell Marsh COVID-19 : काय आहेत ऑस्ट्रेलियाचे नवे कोरोना प्रोटोकॉल

अनिरुद्ध संकपाळ

Mitchell Marsh COVID-19 : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी 20 मालिका शुक्रवारपासून सुरू होत आहे. मात्र पहिल्या सामन्यापूर्वीच मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाली आहे. तो संघापासून दूर झाला आहे. असं असलं तरी मिचेल मार्श सामना खेळणार आहे. डेली मेलने दिलेल्या बातमीनुसार मार्शला कोरनाची लागण झाली आहे. मात्र तो क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा प्रोटोकॉल फॉलो करत सामना खेळणार आहे. यात ड्रेसिंग रूमच्या बाहेर थांबणं अन् मैदानावर खेळाडूंशी अंतर राखून ठेवणं याचा समावेश आहे.

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी जॉश इंग्लिस आणि कॅमरून ग्रीन यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र तरी देखील त्यांचा संघात समावेश होता. दोन्ही खेळाडू राष्ट्रगीत सुरू असताना संघापासून दूर उभे होते. ग्रीन कोरोना पॉझिटिव्ह असतानाही विंडीजविरूद्ध गाबा कसोटीत खेळला अन् विकेटचा जल्लोष करत असताना संघापासून दूर राहिला.

ऑस्ट्रेलियाच्या संघातील खेळाडू सातत्याने कोरोना पॉझिटिव्ह होत आहेत. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीज यांच्यातील तीन टी 20 सामन्यांची मालिका 9 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. ही मालिका ऑस्ट्रेलियात होत आहे.

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार मिचेल मार्श हा ऑस्ट्रेलियाकडून 2011 पासून खेळतोय. त्याने 49 टी 20, 89 वनडे आणि 40 कसोटी सामने खेळले आहेत. त्याने टी 20 मध्ये 1272, वनडेत 2672 आणि कसोटीत 1890 धावा केल्या आहेत. मार्शने टी 20 क्रिकेटमध्ये यापूर्वीही कर्णधारपद भूषवले आहे. आगामी टी 20 वर्ल्डकपमध्ये देखील तो ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करू शकतो.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT