Mitchell Santner ESAKAL
क्रीडा

COVID 19 : क्रिकेट संघात कोरोनाचा शिरकाव; अष्टपैलू खेळाडू पहिल्या टी 20 सामन्याला मुकणार

अनिरुद्ध संकपाळ

Covid 19 NZ vs PAK : पाकिस्तानचा संघ सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पाच टी 20 सामन्यांची मालिका होणार असून आज (दि. 12) मालिकेतील पहिला सामना ऑकलंड येथे होणार आहे. मात्र त्यापूर्वीच यजमान संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघातील डावखुरा फिरकी गोलंदाज मिचेल सँटनरला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो दुसऱ्या टी 20 सामन्याला मुकणार आहे.

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने सँटनरला कोरोनाची लागण झाल्याचे ट्विट करून सांगितले. 'मिचेल सँटनर हा एडन पार्कवर होणाऱ्या पहिल्या टी 20 सामन्यासाठी रवाना होणार नाहीये. पाकिस्तान सोबतच्या पहिल्या टी 20 सामन्यापूर्वी सँटनरची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. काही दिवस त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवले जाईल. तो एकटा त्याच्या घरी हॅमल्टनसाठी रवाना झाला आहे.'

मिचेल सँटनर हा न्यूझीलंडच्या टी 20 संघातील एक महत्वाचा खेळाडू आहे. त्याने 64 डावात 16.94 च्या सरासरीने 610 धावा केल्या आहेत. त्यात एका अर्धशतकाचा देखील समावेश आहे. याचबरोबर आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये 93 सामन्यात 105 विकेट्स देखील घेतल्या आहेत.

न्यूझीलंडचा संघ :

डेवॉन कॉन्वे, फिन एलन, केन विलियम्सन, मार्क कॅम्पमन, ग्लेन फिलिप्स, डॅरेल मिचेल, टीम सैफर्ट, मिचेल सँटनर, टीम साऊदी, इश सोदी, मॅट हेन्री, अॅडम मिलने, बेन सेआर्स.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT