Mithali Raj esakal
क्रीडा

मिताली राजने निवृत्ती घेतानाच दिले 'सेकंड इंनिंग'चे संकेत

धनश्री ओतारी

भारतीय महिला क्रिकेट कसोट आणि वनडे संघाची कर्णधार मिताली राजने बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्व फॉरमॅटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३९ वर्षीय मितालीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २३ वर्षे भारताचे प्रतिनिधित्व केले. निवृत्तीची घोषणा करताना मितालीने तिच्या भविष्याबद्दलही माहिती दिली आहे.

न्यूझीलंडमध्ये आयोजित झालेल्या महिला वनडे वर्ल्डकपमध्ये तिने भारतीय संघाचे नेतृत्व केले होते. त्यानंतरही तिच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र तिने याबाबत नंतर निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते. मात्र, तिनं अचानक निवृत्तीचा घोषणा करत सर्वांना धक्का दिला.

सोशल मीडियाद्वारे मितालीने निवृत्ती जाहिर केली. यावेळी तिनं “तुमच्या सर्व प्रेम आणि समर्थनासाठी धन्यवाद! मी तुमच्या आशीर्वाद आणि समर्थनासह माझ्या दुसऱ्या डावाची सुरुवात करत आहे.” असे कॅप्शनमध्ये म्हणत दुसऱ्या इनिंगमध्ये काय करणार आहे. याचे संकेत दिले आहेत.

मिताली राजने निवृत्ती घेतानाच दिले 'सेकंड इंनिंग'चे संकेत

मितालीने केलेल्या पोस्टमध्ये, भारतीय संघाची कमान सांभाळणे हे माझ्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. या क्रिकेटच्या प्रवासादरम्यान, मी एक चांगली व्यक्ती बनू शकले. आणि भारतीय क्रिकेटला पुढे नेण्यात मला यश प्राप्त झाले आहे.

भलेही हा प्रवास संपला असला तरी मी कोणत्या ना कोणत्या रुपात क्रिकेटच्या दुनियेसोबत जोडली राहिन. निवृत्ती जाहिर केली असली तरी जगभरात महिला क्रिकेटला पुढे नेण्यासाठी संघर्ष करत राहिन. असे मितालीने पोस्ट मध्ये म्हटले आहे.

त्यामुळे ती, खेळाडू नसली तर कॉमेंट्री, कोच, किंवा मेंटॉरच्या भूमिकेत पाहायला मिळणार असल्याचे संकेत तिने दिले आहेत.

विशेष म्हणजे काही दिवासांपूर्वी, बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने तिच्या भविष्याबद्दल माहिती दिली होती. "युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्यासाठी मिताली संघात असेल. एक वरिष्ठ खेळाडू म्हणून तिला तिची भूमिका चांगलीच समजते. मात्र, राष्ट्रीय संघात नसताना ती देशांतर्गत स्पर्धा सोडत नाही. अशी भविष्यवाणी बीसीसीआय एका सुत्राने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत केली होती.

आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वाधिक धावा करणाऱ्या मितालीने गेल्या वर्षी टी-२० स्पर्धेच्या ट्रॉफीवर रेल्वेचे नेतृत्व केले होते.

मितालीने तिच्या 23 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ब्रेक लावला. 39 वर्षीय मिताली राजने 8 जून रोजी ट्विटरवर एक दीर्घ संदेश जारी करून निवृत्तीची घोषणा केली.

मितालीने तिच्या मेसेजमध्ये लिहिले की, “जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले तेव्हा मी लहान होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली 23 वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.” असेही तिनं पोस्टमध्ये म्हटलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT