Mohammad Kaif praise for Suryakumar Yadav ESAKAL
क्रीडा

Suryakumar Yadav : चौथ्या क्रमांकावर रूमाल टाकला, आता हलणार नाही! कैफची स्तुतीसुमने

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Kaif praise for Suryakumar Yadav : भारताचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद कैफने सूर्यकुमार यादवचे तोंडभरून कौतुक केले. सूर्यकुमार यादवने ग्रीनफिल्डवरील आव्हानात्मक खेळपट्टीवर देखील आक्रमक अर्धशतकी खेळी करत भारताच्या विजयाला हातभार लावला. विशेष म्हणजे रोहित आणि विराट स्वस्तात माघारी गेले असताना सूर्यकुमार आणि केएल राहुल यांनी डाव सावरत भारताचा विजय साकरला. सूर्यकुमारच्या या खेळीनंतर मोहम्मद कौफने ट्विट करून सूर्यकुमार यादववर स्तुतीसुमने उधळली.

मोहम्मद कौफने ट्विट केले की, 'उच्च दर्जाचा वेगवाग गोलंदाज किंवा फिरकीपटू असो, खेळपट्टी फिरकीला साथ देणारी किंवा वेगाव गोलंदाजांना पोषक असो, सामना अवघड स्थितीत असो कोणतीही गोष्ट सूर्याला बदलू शकत नाही. तो एखाद्यावेळेस ऑरेंज कॅप जिंकू शकत नाही, सामनावीराचा पुरस्कार मिळणार नाही मात्र तो तुम्हाला सामने जिंकून देऊ शकतो. नंबर 4 वर सूर्याने रूमाल टाकला आहे. आता तो तेथून मोठ्या काळासाठी हलणार नाही.'

सूर्यकुमार यादव हा सध्याच्या घडीला टी 20 क्रिकेटमधील क्रमांक दोन चा फलंदाज आहे. त्याने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेत पुन्हा एकदा आपल्या फलंदाजीची कमाल दाखवून दिली. त्याने सलामीला आलेल्या केएल राहुल सोबत नाबाद भागीदारी रचली. यात सूर्याने आक्रमक रोल निभावला तर राहुल दुसऱ्या बाजूने सावध खेळत त्याला साथ देत होता.

सूर्यकुमार यादवने 33 चेंडूत नाबाद 50 धावांची खेळी केली. यात त्याने पाच चौकार आणि तीन षटकार मारले. दुसरीकडे केएल राहुलने 56 चेंडूत नाबाद 51 धावा केल्या. भारताने प्रथम गोलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेला 106 धावात गुंडाळले. अर्शदीप सिंग आणि दीपक चाहरने भेदक मारा केला. या दोघांनी आफ्रिकेची टॉप ऑर्डर उडवली. अर्शदीपने 3 तर दीपक चाहरलने दोन विकेट्स घेतल्या. हर्षल पटेलने देखील दोन विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली.

दक्षिण आफ्रिकेची अवस्था 5 बाद 9 धावा अशी झाली असताने केशव महाराजने केलेल्या झुंजार 41 धावांच्या जोरावर आफ्रिकेने शंभरी पार केली. आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसरा टी 20 सामना हा रविवारी गुवाहाटी येथे होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pravin Gaikwad: ''गौरव मोरेसुद्धा घाबरलेला'', प्रवीण गायकवाडांचा धक्कादायक खुलासा

Nishikant Dubey : मराठी जनतेचा अपमान; मनसेची खासदार निशिकांत दुबे यांना मानहानीची नोटीस

'वॉर 2' चा धमाकेदार पोस्टर रिलीज, हृतिक, ज्युनियर एनटीआर, कियाराची जबरदस्त झलक!

Buldhana Crime : अनैतिक संबंधातून विवाहितेचा खून; पेनटाकळी धरणात आढळला होता मृतदेह, आरोपीला अटक

Latest Maharashtra News Updates : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे टेस्ला इलेक्ट्रिक कारमध्ये सवार!

SCROLL FOR NEXT