Mohammad Siraj esakal
क्रीडा

Mohammad Siraj : श्रीलंकेविरूद्धच्या गेल्या सामन्यात... अखेर मोहम्मद सिराजने आपले स्वप्न केलं पूर्ण

अनिरुद्ध संकपाळ

Mohammad Siraj Asia Cup 2023 : आशिया कप 2023 ची फायनल अवघ्या 21.3 षटकात संपुष्टात आली. भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकेला 15.2 षटकात 50 धावात गुंडाळले. वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने 7 षटकात 21 धावा देत 6 विकेट्स घेतल्या अन् लंकेच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले.

विशेष म्हणजे मोहम्मद सिराजने चौथ्या षटकात 4 विकेट्स घेत धमाका केला. श्रीलंकेकडून कुसल मेंडीस (17) आणि दुशान हेमनथा (13) यांनी दुहेरी आकडा पार केला. मोहम्मद सिराजने फक्त 16 चेंडूत 5 विकेट्स घेत वर्ल्ड रेकॉर्डशी बरोबरी केली. यापूर्वी श्रीलंकेच्याच चमिंडा वासने 2003 मध्ये वर्ल्डकपमध्ये 16 चेंडूत 5 विकेट्स घेतल्या होत्या. (India Vs Sir Lanka)

मोहम्मद सिराज आशिया कपच्या फायनलमध्ये धमाकेदार कामगिरी केल्यानंतर जाम खूष होता. त्याने सामना संपल्यानंतर आपल्या मनातील भावना बोलून दाखवल्या.

समालोचक संजय मांजरेकर यांच्याशी बोलताना मोहम्मद सिराज म्हणला, 'आज माझं स्वप्न पूर्ण झालं. जेवढं नशीबात असतं तेवढं मिळतं.' मांजरेकरांनी सिराजला एका षटकात चार विकेट्स एकूण सहा विकेट्स घेण्याची कमाल तू कशी केलीस? असे विचारले.

त्यावर सिराज म्हणाला, 'आत चेंडू चांगला स्विंग होत होता. मी कायम वॉवल सीमने गोलंदाजी करून विकेट्स घेतो. आऊट स्विंगवर नाही. मात्र आज दिवस वेगळा होता. ही खेळपट्टी अशी आहे जिथे तुम्ही विकेट घेण्याचा फार मागे लागला नाहीत तरच तुम्हाला विकेट्स मिळतात. एका लेंथवर गोलंदाजी करत जा तुम्हाला यश मिळते. मी देखील हेच केले.'

भारताने आठव्यांदा जिंकला आशिया कप

भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यात आज श्रीलंकेच्या सर्व विकेट्स या भारताच्या वेगवान गोलंदाजांनी घेतल्या. सिराजने 21 धावा देत 6 तर हार्दिक पांड्याने 3 विकेट्स घेतल्या. जसप्रीत बुमराहने एक विकेट घेतली. नाणेफेकीनंतर सामना पावसामुळे 40 मिनीटे उशिरा सुरू झाला.

भारताने श्रीलंकेचे 51 धावांचे आव्हान 6.1 षटकात पार केले. शुभमन गिलने नाबाद 27 तर इशान किशनने नाबाद 22 धावा केल्या. भारताने आठव्यांदा आशिया कप जिंकला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : छत्तीसगडमध्ये २० नक्षलवाद्यांनी पोलिसांसमोर पत्करली शरणागती, ११ जणांवर होते ३३ लाखांचे बक्षीस

Satara News: 'साताऱ्यात एनआरएचएम कर्मचाऱ्यांचे अनोखे आंदोलन'; विविध मागण्यांसाठी सत्यनारायणाची पूजा; १३ दिवसांपासून बेमुदत संप

मोठी बातमी! उतारवयात द्यावी लागणार ‘या’ शिक्षकांना ‘टीईटी’; परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास घ्यावी लागणार सक्तीची सेवानिवृत्ती; शिक्षण विभागाच्या आदेशानंतर होणार कार्यवाही

Koregaon Market Committee: 'कोरेगाव बाजार समितीच्या संचालकपदी सोळसकर'; निवडणुकीत १३ मतांनी विजयी; ओंकार चव्हाण यांना मिळाली चार मते

Morning Breakfast Recipe: 'चिल्ला रॅप'सह सकाळचा नाश्ता बनवा खास, जाणून घ्या सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT