Azharuddin Rohit And Virat Sakal
क्रीडा

रोहित कॅप्टन झाल्यावर अझरुद्दीनचा आनंद गगनात मावेना! म्हणाला...

रोहितच्या कारकिर्दीत टीम इंडिया दमदार कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केलीये.

सुशांत जाधव

भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन (Mohammed Azharuddin) यांनी भारतीय संघाच्या कॅप्टन्सी बदलावर भाष्य केले आहे. बीसीसीआयने (BCCI) विराट कोहलीच्या (Virat Kohli) जागी रोहित शर्माची (Rohit Sharma) कर्णधार म्हणून निवड केलीये. अझरुद्दीन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून हिटमॅन रोहित शर्माला शुभेच्छा दिल्यात. भारतीय टी-20 आणि वनडे संघाला रोहित शर्माकडू मोठ्या आशा आहेत. संघाचे नेतृत्व करण्याची त्याच्यात अधिक क्षमता आहे, असे म्हणत अझरुद्दीन यांनी रोहितच्या कारकिर्दीत टीम इंडिया दमदार कामगिरी करेल, अशी आशा व्यक्त केलीये.

विराट कोहलीने टी-वर्ल्ड कप स्पर्धेनंतर टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेचे नेतृत्व सोडले होते. टी-20 संघाचा भार सोडल्यानंतर वनडे संघातील कर्णधारपद कायम राहिल, असे कोहलीला कदाचित वाटले. पण बीसीसीआयने दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कोहलीला आणखी एक दणका दिला. रोहित शर्माकडे वनडेची कॅप्टन्सी देण्यात आली. एवढेच नाही तर कसोटी संघाच्या उपकर्णधारपदीही त्याची निवड करण्यात आली.

बीसीसीआयने बुधवारी एका ट्विटच्या माध्यमातून रोहित शर्मावर नवी जबाबदारी देण्यात आल्याचे स्पष्ट केले होते. कोहलीच्या जागी रोहितची निवड केल्याप्रकरणी अझरुद्दीन यांच्या आधी सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) या मुद्दावर भाष्य केले होते. ते म्हणाले की, मर्यादित षटकांसाठी आणि कसोटीसाठी दोन वेगळे कर्णधार ही संकल्पना निवड समितीस मान्य नव्हती. बीसीसीआय प्रशासक आणि निवड समितीच्या सदस्यांनी मिळून यावर अंतिम निर्णय घेतला. टी-20 आणि वनडे संघाला रोहित योग्य दिशा देईल, असेही गांगुली म्हणाले होते.

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने दमदार कामगिरी केली आहे. पण आयसीसीच्या स्पर्धेत विराट कोहली कॅप्टन म्हणून कमनशिबी ठरलाय. 2017 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी, 2019 मध्ये फिफ्टी फिफ्टी वर्ल्ड कप आणि 2021 मध्ये युएईच्या मैदानात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला नावाला साजेसा खेळ करण्यात अपयश आले. मर्यादित षटकातील आयसीसी ट्रॉफी जिंकण्याच्या तीन संधी विराटच्या नेतृत्वाखालील संघाने गमावल्या. आगामी दोन वर्षात पुन्हा दोन वर्ल्ड कप होणार आहेत, याचाच विचार करुन बीसीसीआयने कठोर निर्णय घेत कोहलीला कॅप्टन्सीवरुन काढून रोहित शर्मावर विश्वास दर्शवल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT