Mohammed Shami  esakal
क्रीडा

Mohammed Shami : आजपर्यंत एकाही भारतीय गोलंदाजाला जे जमलं नाही ते शामीनं करून दाखवलं

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami World Cup Record : न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन आणि डॅरेल मिचेल यांनी तिसऱ्या विकेटसाठी 181 धावांची खणखणीत भागीदारी रचली होती. त्यांनी 25 व्या षटकातच 200 धावांच्या पार पोहचवले. त्यात शामीने विलिलमयसनचा झेल सोडून अख्ख्या भारताला टेन्शन दिलं होतं.

हा कॅच आपल्याला खूप महागात तर पडणार नाही ना असं वाटत असतानाच मोहम्मद शामीने कॅचची भरपाई केली. त्याने विलियमसनला 69 धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. ही त्याची 50 वी वर्ल्डकप विकेट ठरली. पाठोपाठ त्याने टॉम लॅथमला बाद करत आपला वर्ल्डकपमधील 51 वा बळी टिपला.

मोहम्मद शामीने याबरोबरच भारताकडून वर्ल्डकपमध्ये 17 डावात 51 विकेट्स घेतल्या. तो भारताकडून वर्ल्डकपमध्ये 50 विकेट्स घेणारा पहिला खेळाडू ठरला. यापूर्वी जहीर खानने 23 डावात 44 विकेट्स घेतल्या आहेत. तर जवागल श्रीनाथनेही 33 डावात 44 विकेट्स घेतल्या आहेत. जसप्रीत बुमराहने 19 डावात 35 विकेट्स घेतल्या आहेत. तर अनिल कुंबळेने 18 डावात 31 विकेट्स घेतल्या आहेत.

मोहम्मद शामीने आजच्या सामन्यात अनेक विक्रम केले आहेत. त्याने 57 धावा देत 7 विकेट्स घेतल्या. ही एखाद्या भारतीय गोलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये केलेली सर्वोत्तम कामगिरी आहे. यापूर्वी कोणत्याही फलंदाजाने वनडे क्रिकेटमध्ये एका सामन्यात 7 विकेट्स घेतल्या नव्हत्या.

याचबरोबर वर्ल्डकपमध्ये एका एडिशनमध्ये मोहम्मद शामीने भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. त्याने आतापर्यंत 23 विकेट्स घेतल्या आहेत. एका भारतीयाने एका वर्ल्डकप एडिशनमध्ये केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे.

मोहम्मद शामीने वर्ल्डकपमध्ये सर्वाधिकवेळा 5 विकेट्स घेण्याचा विक्रम देखील आपल्या नावावर केला. शामीची 57 धावात 7 बळी ही भारताकडूनची वर्ल्डकपमधील सर्वात चांगली बॉलिंग फिगर आहे. तसेच तो वर्ल्डकपमध्ये सर्वात वेगाने 50 विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT