Mohammed Shami  esakal
क्रीडा

Mohammed Shami : तो आला अन् त्यानं जिंकलं.... संधीची वाट पाहत बेंचवर बसला; आता शमीचा तो Video होतोय व्हायरल

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami : भारताने आशिया कपच्या सुपर 4 मधील बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात आपल्या संघात 5 बदल केले. वेस्ट इंडीज दौऱ्यावरील कसोटी मालिकेनंतर विश्रांती देण्यात आलेल्या मोहम्मद शमीला अखेर आपले हात मोकळे करण्याची संधी मिळाली.

रोहित शर्माने बांगलादेशविरूद्धच्या सामन्यात अनेक दिग्गज खेळाडूंना विश्रांती दिली. भारत आधीच फायनलमध्ये पोहचल्याने या सामन्याचा भारताच्या फायनल खेळवण्यावर कोणताही परिणाम होणार नाही.

रोहितने मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह यांना विश्रांती दिली. त्यांच्या जागी मोहम्मद शमी आणि प्रसिद्ध कृष्णा आजचा सामना खेळत आहेत. वर्ल्डकपपूर्वी मोहम्मद शमीला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आहे.

या संधीचे मोहम्मद शमीने चांगलाच फायदा उचलला. त्याने आपल्या दुसऱ्याच षटकात बांगलादेशचा सलामीवीर लिटन दासचा त्रिफळा उडवला. मोहम्मद शमी हा आपल्या सीम गोलंदाजीसाठी ओळखला जातो. लिटन दासला त्याने एक इन स्विंग चेंडू टाकला अन् त्याची बॅट पॅड गॅपमधून दांडी गुल केली.

भारत आणि बांगलादेश सामन्याबद्दल बोलायचं झालं तर नाणेफेक जिंकून भारताने बांगलादेशला सुरूवातालीच धक्के दिले. मोहम्मद शमी आणि शार्दुल ठाकूरने बांगलादेशची अवस्था 3 बाद 28 धावा अशी केली होती. त्यानंतर शाकिब अल हसन आणि मेहदी हसन मिराज यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र अक्षर पटेलने मेहदीला 13 धावांवर बाद करत ही जोडी फोडली.

मात्र त्यानंतर शाकिबने तोहिद सोबत शतकी भागीदारी रचली. या दोघांनी बांगलादेशला 160 धावांपर्यंत पोहचवले. शाकिबने दमदार अर्धशतकी खेळी केली. तो आपल्या शतकाच्या जवळ पोहचत असतानाच शार्दुल ठाकूरने ही जोडी फोडली. त्याने शाकिबला 80 धावांवर बाद केले. यानंतर रविंद्र जडेजाने शामिम हसनला 1 धावेवर बाद करत बांगलादेशला सहावा धक्का दिला.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-China News: भारत अन् चीनमधील ‘LAC’वरील मोठा वाद मिटणार!

Maharashtra Hospitals : पाच हजार रुग्णालयांना ‘कारणे दाखवा’ नोटीस; तीस दिवसांनंतर परवाना होणार निलंबित

Pune Flood : पुणे शहरात पुरामुळे पंधराशे नागरिकांना हलविले; मुळामुठा नदीत ८५ हजार क्यूसेस पाणी सोडले

Indian Railways Special Trains: मोठी बातमी! दिवाळी-छठ दरम्यान रेल्वे तब्बल १२ हजारांहून अधिक विशेष गाड्या चालवणार

ICC ODI Rankings: केशव महाराज झाला नंबर वन बॉलर! पण बुमराहचं नाव झालं गायब? चर्चेला उधाण

SCROLL FOR NEXT