Mohammed Shami Covid-19 positive Umesh Yadav named as replacement sakal
क्रीडा

Ind vs Aus : शमीऐवजी 'या' खेळाडूला संधी, तीन वर्षांपासून खेळला नाही T20 सामना!

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का

Kiran Mahanavar

India vs Australia Mohammed Shami Replacement : ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. या कारणामुळे तो मोहालीला आला नाही. जिथे 20 सप्टेंबरपासून तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळवला जाणार आहे. आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) त्याच्या बदली खेळाडूचा शोध सुरू केला आहे.

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना 20 सप्टेंबर रोजी मोहाली येथे खेळला जाणार आहे. अॅरॉन फिंचच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियन संघ मोहालीत पोहोचला असून त्यांनी सरावही सुरू केला आहे. क्रिकबझ वेबसाइटनुसार, कोविड-19 पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शमीला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संपूर्ण टी-20 मालिकेतून वगळण्यात आले आहे.

आशिया कप-2022 मध्ये भारतीय संघाची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या टी-20 मालिकेत चुका सुधाराव्यात अशी बीसीसीआयची इच्छा आहे. बोर्डाच्या सूत्रांच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की, उमेश आता तंदुरुस्त आहे. त्याला मोहालीत भारतीय संघात सामील होण्यास सांगण्यात आले आहे. आशिया चषकातील पराभवानंतर निवडकर्त्यांना संघात अनुभवी खेळाडू हवा आहे.

मोहम्मद शमी कोरोना पॉझिटिव्ह आल्यामुळे भारतीय संघात वेगवान गोलंदाज उमेश यादवचा समावेश केला जाऊ शकतो. उमेश यादव गेल्या तीन वर्षांपासून टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेला नाही. विशाखापट्टणम येथे फेब्रुवारी 2019 मध्ये त्याने शेवटचा टी-20 सामना खेळला होता. या वर्षी जानेवारीमध्ये तो शेवटचा कसोटी जर्सीमध्ये दिसला होता.

देशांतर्गत क्रिकेटमध्ये विदर्भाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या उमेश यादवने भारतासाठी केवळ सात टी-२० सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याने 9 विकेट घेतल्या आहेत. त्याच्या नावावर कसोटीत 158 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये 106 विकेट्स आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: घरासमोर CID अधिकारी, 'हिट स्प्रे' ग्रुपचा दावा अन्... DCP ला थेट फोन करत अभिजीत दिपकेंचे गंभीर आरोप, नेमकं काय घडलं?

Rohit Sharma: रोहित नाही तर कोण? 2027 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाकडे सलामीचे हे 3 पर्याय; एक नाव सर्वात आघाडीवर

FDA Crime : आयुर्वेदिक औषधांत आढळली बुरशी अन्‌ अळ्या; इंड्युकेअर फार्माचा उत्पादन परवाना रद्द

Voter List : मतदार यादीतून वगळलेल्या मतदाराला पुन्हा मिळणार स्थान; फॉर्म ६ भरून द्यावा लागणार पुरावा

AUSTRALIAN CRICKET AWARDS : ट्रॅव्हिस हेडने सलग दुसऱ्या वर्षी जिंकला मानाचा पुरस्कार! वॉर्नर, पाँटिंग, वॉटसन यांच्या पंक्तित स्थान

SCROLL FOR NEXT