Mohammed Shami injury hospital photo viral emotional post  
क्रीडा

Mohammed Shami: कारकिर्दीत मला अनेक दुखापती...मोहम्मद शमीने शेअर केली भावूक पोस्ट

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला

सकाळ डिजिटल टीम

बांगलादेश दौऱ्यावर असलेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे या वनडे मालिकेतून बाहेर पडला आहे. शमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Mohammed Shami injury hospital photo viral emotional post )

तीन सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी मोहम्मद शमीच्या जागी उमरान मलिकला संधी दिली आहे. दरम्यान, शमीचे रुग्णालयातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. शमीने स्वतःहून रुग्णालयातील फोटो शेअर करत भावून पोस्ट लिहिली आहे. जी सध्या व्हायरल होताना दिसत आहे.

32 वर्षीय मोहम्मद शमी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर टी-20 विश्वचषक खेळला होता. यानंतर शमी परतल्यावर सरावाच्या वेळीच दुखापत झाली. या दुखापतीमुळे तो बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेतून बाहेर पडला.

नुकतचं शमीने आपल्या इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. " दुखापत सर्वसाधारण आहे. प्रत्येक क्षणाचे कौतुक करायला शिकवते. माझ्या कारकिर्दीत मला अनेक दुखापती झाल्या आहेत. हे तुम्हाला एक दृष्टीकोन देते." तसेच, माझ्या कारकिर्दीत मी किती वेळा दुखावलो हे महत्त्वाचे नाही. मी प्रत्येक वेळी दुखापतींमधून शिकलो आहे. यासह जोरदार पुनरागमन केले आहे. अशा आशयाची भावनिक पोस्ट शमीने लिहिली आहे.

वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर झाला आहे. तो यापुढे बांगलादेशविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळू शकणार नाही. बांगलादेशमध्ये तीन वनडे मालिकेतील पहिला सामना रविवारी होणार आहे. वनडेनंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिकाही खेळायची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly election results 2026 Live Update : १९ व्या फेरीत सुनेत्रा पवारांनी केला पराक्रम, तब्बल १ लाख ६८ हजार मतांची आघाडी

Thalapathy Vijay Victory : 40 वर्षांचा अनुभव अन् अचूक टायमिंग! कोण आहेत ज्योतिषी राधन पंडित? ज्यांनी 'थलपती'च्या विजयाचं केलं होतं भाकीत?

Thermos Linked to Eye Injury Risk: थर्मास ठरतोय डोळ्यांसाठी धोकादायक? नव्या समस्येमुळे जगभरात ८ दशलक्षांहून अधिक प्रोडक्ट्सचा रीकॉल

'तुझा नेता हरतोय...' तरुणाने अफवांवर विश्वास ठेवला; थलपती विजयच्या चाहत्याने निकालाआधीच टोकाचा निर्णय घेतला

West Bengal Election Results : पश्चिम बंगालमध्ये ममतांचा गेम कसा पलटला? भाजपच्या ५ डावांनी बदललं संपूर्ण राजकारण!

SCROLL FOR NEXT