Mohammed Shami  esakal
क्रीडा

Mohammed Shami : बीसीसीआयची विशेष शिफारस; अर्जुन पुरस्कारासाठी मोहम्मद शमीचं नाव आघाडीवर?

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami Arjun Award : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने नुकताच झालेला वनडे वर्ल्डकप गाजवला. आता त्याला याचं मोठं फळ मिळण्याची शक्यता आहे. एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने मोहम्मद शमीला 2023 चा अर्जुन पुरस्कार मिळावा यासाठी विशेष शिफारस केली आहे.

एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार बीसीसीआयने मोहम्मद शमीचे अर्जुन पुरस्कारांच्या यादीत नाव समाविष्ट करावे यासाठी खास विनंती केली आहे. मूळ यादीत मोहम्मद शमीचे नाव नव्हते. मात्र वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या शमीसाठी बीसीसीआयने आता खास विनंती केली आहे.

मोहम्मद शमी हा वर्ल्डकपमधील पहिले चार सामने बेंचवर होता. मात्र त्याला संधी मिळताच त्याने आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं. तो बघता बघता वर्ल्डकप 2023 मधील सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज ठरला. त्याने फक्त 7 सामन्यात 24 विकेट्स घेतल्या.

मोहम्मद शमीची वर्ल्डकपमधील कामगिरी पाहून बीसीसीआयने त्याची अर्जुन पुरस्कार 2023 साठी खास शिफारस केली आहे. आता केंद्र सरकारची समिती यावर काय निर्णय घेते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

सेमी फायनलमध्ये दमदार कामगिरी

मोहम्मद शमीने 2013 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत 64 कसोटी 101 वनडे आणि 23 टी 20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 229 विकेट्स, वनडेत 195 तर टी 20 मध्ये 24 विकेट्स घेतल्या आहेत.

वानखेडे स्टेडियमवर झालेल्या श्रीलंकेविरूद्धच्या साखळी फेरीतील सामन्या त्याने 18 धावा देत 5 विकेट्स घेतल्या होत्या. तर न्यूझीलंडविरूद्धच्या सेमी फायनलमध्ये त्याने 57 धावा देत 7 विकेट्स घेतल्या होत्या. त्याच्या या दमदार कामगिरीच्या जोरावर भारताने फायनल गाठली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market: शेवटच्या तासात शेअर बाजाराचा यू-टर्न! घसरणीनंतर सेन्सेक्स वाढीसह बंद; तर निफ्टी...; वाचा बाजाराची स्थिती

Health and Safety : गरजूंना कृत्रिम अवयव मिळणार खासदार सोनवणेंचा पुढाकार; १८ जुलैपासून शिबिर

Hotel Bhaghyashree: 'हॉटेल भाग्यश्री'च्या मालकाने घेतला मोठा निर्णय; कोट्यवधी रुपयांची केली गुंतवणूक, हॉटेल बंद...

Pune News: कोथरुडमधील आजी-आजोबांच्या वडापाव गाडीवर महापालिकेचा अन्याय, तोंडचा घास हिरावणारी कारवाई

प्राजक्ताने खरेदी केली अलिशान गाडी! व्हिडिओ शेअर करत म्हणाली...'आई शप्पथ! लई भारी वाटतंय स्वप्न पुर्ण होताना..'

SCROLL FOR NEXT