Mohammed Shami esakal
क्रीडा

Mohammed Shami : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी भारताला मोठा धक्का; वेगवान गोलंदाजीची धार कमी होणार?

अनिरुद्ध संकपाळ

Mohammed Shami : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 26 डिसेंबरपासून सुरू होत आहे. मात्र या मालिकेपूर्वीच भारताला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी कसोटी मालिकाला मुकण्याची दाट शक्यता आहे. याबाबतचे वृत्त क्रिकबझने दिले आहे.

क्रिकेटबझच्या 5 डिसेंबरला दिलेल्या वृत्तानुसार वर्ल्डकपमधील भारताचा हिरो मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्याची शक्यता अत्यंत कमी आहे. कसोटी मालिकेसाठी रवाना होत असलेल्या भारतीय खेळाडूंच्या यादीत त्याचे नाव नाहीये. हा दक्षिण आफ्रिकेला जाणारा भारतीय खेळाडूंचा शेवटचा संच आहे.

दक्षिण आफ्रिकेविरूद्धची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघातील खेळाडूंचा शेवटचा संच हा 15 डिसेंबरला जोहान्सबर्गसाठी रवाना होणार आहे. यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहली, जसप्रीत बुमराह, आर. अश्विन, नवदीप सैनी आणि हर्षित राणा यांचा समावेश आहे. हे खेळाडू दुबई मार्गे दक्षिण आफ्रिकेत जाणार आहेत.

या यादीत मोहम्मद शमीचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. तो दक्षिण आफ्रिका दौऱ्याला मुकण्याची शक्यता आहे. मात्र निवडसमितीने शमीच्या रिप्लेसमेंटची घोषणा केलेली नाही. कारण टी 20, वनडे आणि अ संघामधील मालिका खेळण्यासाठी अनेक खेळाडू दक्षिण आफ्रिकेत दाखल झाले आहे. त्यामुळे खेळाडूंची कमतरता नाहीये.

त्यातील एक वेगान गोलंदाज कसोटी संघात समाविष्ट करता येईल. सध्या 75 पेक्षा जास्त भारतीय खेळाडू दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहेत.

तत्पूर्वी, बीसीसीआयने दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघ जाहीर करतानाच मोहम्मद शमीची उपलब्धता ही त्याच्या फिटनेसवर अवलंबून असल्याचे सांगितले होते.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलचे सलग दुसरे शतक! रोहित शर्माची त्याचदिशेने वाटचाल, पण, मोडला सचिनचा विक्रम, जगात दुसरा नंबर

Interest Rate: PPF-Sukanya योजनेत पैसे गुंतवलेत? बचत करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! PPFसह या योजनांचे व्याजदर कायम; पाहा कुठे मिळतं 8.2% व्याज

Pune Crime: बिग बॉस’फेम दिव्या शिंदेची पोलिस कोठडी वाढली; डॉ. गायकवाड हल्ला-खंडणी प्रकरणात १७ जणांचा सहभाग निष्पन्न

IND vs WI 2nd ODI : रोहित शर्मा, शुभमन गिल यांचा १० षटकांतच वर्ल्ड रेकॉर्ड! जगात भारी टीम इंडियाचे कारभारी; विडींजला रडकुंडीला आणले

Kannad Sugarcane Fire: दुष्काळात कष्टाने जगविलेला ऊस विद्युत तारेने जाळला; कन्नडमध्ये शेतकऱ्याचे अडीच लाखांचे नुकसान

SCROLL FOR NEXT