Mohammed Shami esakal
क्रीडा

Mohammed Shami : गर्व से कहता हूं कि मुस्लिम हूं..! सजदा वादावर मोहम्मद शमीचे मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

Mohammed Shami : क्रिकेटच्या इतिहासात अशी काही कामगिरी आहेत. ज्या चाहत्यांच्या आणि प्रेक्षकांच्या मनावर छाप सोडतात. भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने 2023 च्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये कहर केला होता.

स्पर्धेच्या सुरुवातीच्या टप्प्यात शमी पहिल्या 4 सामन्यात खेळू शकला नाही. यानंतर त्याला संधी मिळाल्यावर त्याने स्पर्धेतील उर्वरित 7 सामन्यांमध्ये धुमाकूळ घातला. या सात सामन्यांमध्ये त्याने 24 विकेट्स घेऊन, केवळ स्पर्धेतील यशस्वी गोलंदाजच नाही तर वर्ल्ड कपमधील सर्वात भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज बनला.

या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेविरुद्धचा सामना शमीने गाजावला होता. त्या सामन्याचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता, ज्यामध्ये शमी 5 विकेट घेतल्यानंतर मैदानावर बसला होता. तेव्हा पाकिस्तानी लोकांनी सोशल मीडियावर सांगितले होते की, शमी हा भारतीय मुस्लिम आहे, त्याला सजदा करायचा होता, पण तो घाबरला. भारतातील भीतीमुळे तो करू शकला नाही.

यावर टीव्ही चॅनल आज तकच्या स्पेशल शो एजेंडामध्ये जेव्हा अँकरने मोहम्मद शमीला याबद्दल प्रश्न विचारला. तेव्हा शमी म्हणाला की, 'यार, कुणाला सजदा करायचा असेल तर कोण अडवणार आहे? जर मला ते करायचे असेल तर मी ते करेन. मी मुस्लिम आहे, मी अभिमानाने सांगतो की मी मुस्लिम आहे. मी भारतीय आहे म्हणून मी अभिमानाने सांगतो की होय मी भारतीय आहे. मला काही अडचण आली असेल तर मी भारतात राहत नसतो. मला सजदा करण्यासाठी कोणाची परवानगी लागली तर मी इथे का थांबू?

स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी पुढे म्हणाला की, मी इन्स्टाग्रामवर त्या सर्व गोष्टी पाहिल्या आहेत. मी यापूर्वीही ५ विकेट घेतल्या आहेत. पण कधी सजदा केला नाही. मग त्या दिवशी का करू. आणि अजून एक की मी भारतातील प्रत्येक व्यासपीठावर सजदा करू शकतो. मला कोणीही प्रश्न विचारा मग... हे लोक फक्त त्रास देतात.

शमी पुढे म्हणाला की, 'त्या सामन्यातील ते माझे सहावे षटक होते आणि मी आधीच 3 विकेट घेतल्या होत्या. इथून पुढच्या 3-4 षटकात 5 विकेट्स घ्यायच्या माझ्या मनात होतं. त्यावेळी मी माझ्या क्षमतेपेक्षा 200 टक्के पूर्ण प्रयत्न करत होतो आणि मी थकलो होतो. मी 5 विकेट घेतल्यावर मी गुडघे टेकून बसलो होतो. लोकांनी त्याचे मीम्स बनवले. लोक इतके मोकळे आहेत की त्यांच्याकडे काम नाही.

भारतीय संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. येथे दोन्ही संघांमध्ये 3 टी-20, 3 एकदिवसीय आणि 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. टी-20 मालिकेतील 2 सामने पूर्ण झाले आहेत. ज्यामध्ये भारत ०-१ ने मागे आहे. शमीला आफ्रिकन दौऱ्यावर कसोटी मालिका खेळायची आहे. त्यासाठी तो तयारी करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange: सरकार मराठा समाजापेक्षा मोठं नाही; 29 ऑगस्टच्या आंदोलनाबाबत जरांगेंचा थेट इशारा, अंतरवालीत येण्याचे आवाहन

Koyna Dam Water Level कोयना ९२ टक्के भरले, ६ दरवाजे ३ फुटापर्यंत उघडणार; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Dombivli News: अल्पवयीन मुलीचा लोकलच्या धडकेत मृत्यू प्रकरणाला वेगळं वळण, पोस्टमार्टम रिपोर्ट समोर; तरुणाला अटक, ३ महिन्यापूर्वी...

Marathi News Live Updates : हैद्राबादमधील पेट्रोल आणि डिझेल रिक्षांचे ईव्हीमध्ये रूपांतर करण्यासाठी सरकाकडून १.५ लाख रुपयांपर्यंतचे अनुदान

AUS vs BAN 1st Test : बांगलादेशमुळे कसोटी क्रिकेटमध्ये भूकंप! ऑस्ट्रेलिया चारीमुंड्या चीत, भारताचा फायदा; वाचा WTC Final Scenario

SCROLL FOR NEXT