Mohammed Shami Statement about New Test Captain  esakal
क्रीडा

आमच्याकडे अनेक कॅप्टन पण, रिझल्ट हा मुद्दा आहे : शमी

अनिरुद्ध संकपाळ

विराट कोहलीने (Virat Kohli) कसोटी संघाचे नेतृत्व सोडल्यानंतर भारताचा अनुभवी वेगावान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) कसोटी कर्णधाराबद्दल (Test Captaincy) आपले मत व्यक्त करतोय. भारताने दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिका २-१ अशी गमावली. त्यामुळे मोहम्मद शमीला कोण कर्णधार होणार यापेक्षा भारतच्या हरण्याची आणि जिंकण्याची जास्त काळजी आहे.

मोहम्मद शमीने टेलिग्राफशी बोलताना नव्या कर्णधाराबद्दल (New Test Captain) आपले दृष्टीकोण सर्वांसमोर ठेवला. तो म्हणाला की, नव्या कसोटी कर्णधाराची पहिली कसोटी मालिका ही भारतात होणार आहे ही एक समाधानाची बाब आहे. भारताची श्रीलंकेबरोबरची पुढची दोन कसोटी सामन्यांची मालिका मायदेशात होणार आहे.

याबाबत मोहम्मद शमी (Mohammed Shami) म्हणाला की, 'नक्कीच संघाला कर्णधाराची गरज असते. नव्या कर्णधाराच्या नेतृत्वात भारत आपली पहिली मालिका मायदेशातच खेळणार आहे ही एक चांगली गोष्ट आहे. परिस्थितीशी जुळवून घेण्याचा मुद्दा राहणार नाही ही दिलासादायक बाब आहे.'

शमी पुढे म्हणाला की, 'पण, मला विचाराल तर माझे लक्ष हे मी आणि गोलंदाजी विभाग कशी कामगिरी करतोय याच्यावर असणार आहे. मी संघाचा कर्णधार कोण होणार याची काळजी करत नाही. आमच्याकडे रोहित शर्मा (Rohit Sharma) आहे. अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) देखील आहे. पण, सगळ्यात महत्वाचं आहे ते निकाल. चांगल्या कामगिरीवर लक्ष केंद्रीत करणे आणि मोठी जबाबदारी घेणे हे आता वैयक्तिक खेळाडूंवर अवलंबून असणार आहे. यामुळेच आम्हाला पाहिजे तसा निकाल मिळेल.'

मोहम्मद शमीने घेतलेल्या दोन नावांमध्ये रोहित शर्माची दावेदारी अधिक प्रबळ वाटते. त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी कसोटी संघाचा उपकर्णधारही (Test Vice Captain) करण्यात आले होते. मात्र त्याला दुखापत झाल्याने तो मालिका खेळू शकला नव्हाता. अजिंक्य रहाणेच्या बाबतीत बोलायचे झाले तर रोहित शर्माच्या आधी त्यालाच पसंती मिळाली असती. मात्र आफ्रिका दौऱ्यापूर्वी त्याच्याकडून कसोटी संघाचे उपकर्णधारपद काढून घेण्यात आले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: ठाकरेंचं चॅलेंज फडणवीसांनी स्वीकारलं; म्हणाले, एक लाख रुपये जिंकलो!

रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! पुणे, दौड, काष्टी रुळाचे काम होणार; नागपूर-पुणे मार्गावरील गाड्या झाल्या रद्द..

Nashik Grapes Export : नाशिकच्या द्राक्षांचा परदेशात डंका! नेदरलँड अन् जर्मनीसाठी पहिली ३० टनांची खेप रवाना

Chhatrapati Sambhajinagar News : शहर पर्यटन वाढीला आडकाठी! नियोजित पर्यटन धोरण वर्षभरापासून रखडले

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

SCROLL FOR NEXT