mohammed shami statement playing 11 after take 5 wickets india vs new zealand World Cup 2023 cricket news in marathi  
क्रीडा

IND vs NZ : 'संघातून बाहेर बसणे अवघड...' सामना जिंकून दिल्यानंतर मोहम्मद शमीने केले मोठे वक्तव्य

Kiran Mahanavar

India vs New Zealand Mohammed Shami : वर्ल्ड कप 2023 मध्ये टीम इंडियाने आता न्यूझीलंडचा 4 गडी राखून पराभव करत सलग पाचवा विजय मिळावला. या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

न्यूझीलंडने भारतीय संघाला विजयासाठी 274 धावांचे लक्ष्य दिले होते, जे भारतीय संघाने 6 गडी गमावून पूर्ण केले. या सामन्यात मोहम्मद शमीने भारतासाठी शानदार कामगिरी करत पाच विकेट्स घेतल्या. याच कारणामुळे त्याला सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. या सामन्यानंतर शमीने मोठे वक्तव्य केले आहे.

सामन्यानंतर मोहम्मद शमी म्हणाला की, जेव्हा तुम्ही दीर्घकाळानंतर संघात परतता तेव्हा तुम्हाला आत्मविश्वास वाढवणे आवश्यक आहे आणि या सामन्याने माझ्यासाठी तेच केले.

संघाबाहेर राहण्याबाबत विचारले असता संघाच्या हितासाठी काहीही करण्यास तयार असल्याचे त्याने सांगितले. संघ चांगली कामगिरी करत असेल तर बाहेर बसणे अवघड काम नाही. जेव्हा तुमचे सहकारी चांगले काम करत असतील तेव्हा तुम्ही त्यांना पाठिंबा द्यावा. तुमची टीम नेहमी वर असावी असे तुम्हाला वाटते.

न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने शानदार गोलंदाजी केली. त्याच्यामुळेच भारतीय संघ सामना जिंकू शकला. शमीने न्यूझीलंडविरुद्ध 10 षटकात 54 धावा देत 5 विकेट घेतल्या. शेवटच्या 10 षटकांमध्ये त्याने अतिशय घातक गोलंदाजी केली.

चालू वर्ल्ड कपमध्ये शमी प्रथमच प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळला होता. दुखापतग्रस्त हार्दिक पांड्याच्या जागी त्याला संधी मिळाली होती. शमीने कारकिर्दीत तिसऱ्यांदा पाच विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 273 धावा केल्या. किवी संघाकडून डॅरिल मिशेलने सर्वाधिक 130 धावा केल्या. त्याच्याशिवाय रचिन रवींद्रने 75 धावांचे योगदान दिले. जेव्हा भारतीय संघ लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आला होता. त्यानंतर रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी संघासाठी उत्कृष्ट फलंदाजी केली.

रोहित 46 धावा करून बाद झाला तर गिल 26 धावा करून बाद झाला. यानंतर विराट कोहलीने जबाबदारी स्वीकारली. या सामन्यात त्याने 95 धावा केल्या आणि टीम इंडियाला त्याच्यामुळेच सामना जिंकण्यात यश आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Microsoft News: मायक्रोसॉफ्टचा धक्कादायक निर्णय! तब्बल ६० हजार कर्मचाऱ्यांना स्वेच्छानिवृत्तीची ऑफर; १ डिसेंबरपर्यंत...

Video Viral : "मला २०२७ चा वर्ल्ड कप खेळायचा आहे, त्यामुळे शुभमन गिलला खूश ठेवावे लागेल", असं का म्हणाला रोहित शर्मा?

Latest Marathi News Live Update : शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांची प्रत्यक्ष मतमोजणी दुपारी ३ ते ४ नंतर सुरू होण्याची शक्यता

Sun Transit 2026 in Swati Nakshatra : सूर्य बदलणार चाल! 'या' 5 राशींच्या नशिबात मोठा बदल, पगारवाढ अन् व्यवसायातून होणार तगडा फायदा

Thane Railway Station: कर्मचारी विशेष लोकलचा दरवाजा बंद! ठाणे स्थानकातील संतापजनक प्रकार; प्रवाशांना मनस्ताप

SCROLL FOR NEXT